नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत तरुणीचं नाव ममता राय (२७ वर्ष) असल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी ममताने सुसाईड नोट लिहीली होती आणि ती हॉटेलमधील रुममध्ये सापडली आहे.


ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)मध्ये डर्मेटोलॉजी (त्वचारोग) मध्ये पदव्युत्तरचं शिक्षण घेत होती. अॅकेडमिक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ममता कोच्चिमध्ये दाखल झाली होती. 


कोच्चिमधील पोलीस अधिकारी जोसेफ साजन यांनी सांगितलं की, ममताला स्आतनिक रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता. हॉटेलच्या रुममध्ये सुसाईड नोटसोबतच डिप्रेशनचं औषधही मिळालं. दिल्लीहून १८ जानेवारीला ममता कोच्चीला आली होती. हॉटेलमधील रुम १७ ते २२ जानेवारीपर्यंत बूक करण्यात आला होता. 


ममताने आत्महत्या केली त्यावेळी तिची रुममेट बाहेर गेली होती. ज्यावेळी तिची मैत्रिण परतली त्यावेळी ममताने गळफास घेतल्याचं पहायला मिळालं. 


हॉटेलमध्ये मिळाली सुसाईड नोट


सुसाईड नोटमध्ये लिहीलं होतं की, "मी डिप्रेशनने त्रस्त झाली आहे, लढून-लढून थकली आहे. मी आता क्विट करत आहे. सॉरी पप्पा". ममताच्या वडिलांनी सांगितलं की, ममताच्या मैत्रिणीचा सकाळी साडे नऊ वाजता फोन आला की तिची तब्येत खराब आहे त्यामुळे रुग्णालयात दाखल करत आहोत. 


भावाने केली हत्येचा आरोप


ममताच्या भावाने हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ममताचा भाऊ अमितने पोलिसांना सांगितलं की, ममता प्रत्येक क्षेत्रात टॉपर होती आणि त्यामुळे तिचा सर्वचजण राग करत होते. तिच्या शरीरावर जखमा दिसत आहेत त्यामुळे तिची हत्या झाली आहे.