या ३ वर्षाच्या मुलीने जे केलं ते करा, तिसऱ्या काय, चौथ्या लाटेतही लहान मुलांना धोका नाही
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी सर्वात जास्त घातक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ही शक्यता असली तरी आरोग्याच्या
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी सर्वात जास्त घातक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ही शक्यता असली तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि कोरोनाबाबत आलेल्या वाईट अनुभवातून त्या शक्यतेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, हे तर नक्की आहे. लॉकडाऊनच्या काळात आईवडिलांकडून किंवा माध्यमांकडून लहान मुलांनाही समजायला लागलं आहे की, कोरोना काय आहे, तो होवू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी. आजूबाजूच्या चर्चेमुळे लहान मुलं देखील आता सतर्क झाली आहेत.
आता फोटोत दिसणारी ही ३ वर्षाची मुलगी आहे लिपवी. तिचे आईवडील हे शेतकरी आहेत आणि तिचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. कारण लिपवीला सर्दी खोकल्याचा त्रास होवू लागला. लिपवीला ही लक्षणं कोरोनाच्या काही लक्षणांपैकी असल्याचं लक्षात होतं. लिपवीचे आईवडील शेतीच्या कामात व्यस्त आहेत.
लिपवीने आईवडीलांना वेळ नसला तरी स्वत: घरुन निघताना, नीट मास्क लावून जवळचं हेल्थ सेंटर गाठलं. तिने तेथील डॉक्टरांना सांगितलं की, तिला काय त्रास होत आहे. हे दृश्य सर्वांना आश्चर्यकारक वाटत होतं. कारण ३ वर्षाच्या लिपवीने सतर्क राहून स्वत: दवाखाना गाठला.
तेथील बेन्झामिन येप्थोमी यांनी हा फोटो काढला आणि पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या लोकांना टॅग केला, लिपवीचं सर्वत्र कौतुक होत आहे. खरंच लिपवीसारखी काळजी आणि सतर्कता सर्वांनी दाखवली तर तिसऱ्या काय चौथ्या लाटेतही लहान मुलांना कोरोनाचा धोका नसेल.
अवघ्या ३ वर्षाची लिपवी ही नागालँडमधील झुन्हेबोटो जिल्ह्यातील घटाशी तालुक्याची आहे. दी मोरंग एक्स्प्रेस या स्थानिक वर्तमान पत्राने ही बातमी छापली होती. यानंतर लिपवीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.