Viral Video :  सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यातील काहीच व्हिडीओ असे असतात ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्यक्तीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. अशातच त्या व्यक्तीचं मानवतेच्या दिशेने केले कृत्य पाहून दिल बल्ले बल्ले होईल. (A 62 year old woman was selling fruits man helped punjab video viral on instagram trending video)


VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावरुन जाताना आपल्या भाजी आणि फळं विक्रेत दिसतात. तोही नेहमी प्रमाणे बाहेर निघाला आणि त्याला एक वृद्ध महिला फळ विकताना दिसली. तिचं वय 62 वर्षांचं होतं आणि पोटाची खडगी भरण्यासाठी फळांची विक्री करत होती. तो तिच्याजवळ गेला आणि त्याने फळांचे भाव विचारले. तेव्हा त्या महिलेशी संवाद साधताना त्याला कळलं रोज 12 तास काम करते.  गेल्या तीन वर्षांपासून ती हे काम करत आहे. हे ऐकल्यावर त्या व्यक्तीच्या हृदयस्पर्शी कृत्य नेटकरी अवाक् झाले आहेत. 


ती महिला दिवसाला 100 रुपये कमावते असं म्हणाली. त्यानंतर वृद्ध महिलेला त्या व्यक्तीने सर्व फळं 3000 हजारात विकत घेते. त्याच्या या कृत्याने त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. 
बिझनेस कन्सल्टंट कवलजीत सिंह छाबरा असं या दिलदार व्यक्तीचं नाव आहे. हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्यक्तीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होतं आहे. 


हृदयस्पर्शी पोस्ट !


कवलजीत सिंह छाबरा  यांनी तिच्याजवळून संत्री, सफरचंद आणि केळी विकत घेतली आमि आपल्या गाडीमध्ये ठेवली. छाबरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तिने माझ्याकडे ज्या प्रकारे पाहिलं, मी तिच्या वेदना आणि भावना अनुभवू शकतो.'



छाब्राने पुढे कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मी देवाचा आभारी आहे की त्याने मला अशा क्षणांसाठी निवडलंय, जेव्हा मी एखाद्याची मदत करू शकतो. लक्षात ठेवा, दयाळूपणाची छोटीशी कृती मोठा गोष्ट घडवू शकते. आपल्या सर्वांमध्ये कोणाच्या तरी जीवनात प्रकाश बनण्याची शक्ती असते. जर एक वृद्ध स्त्री दररोज कठोर परिश्रम करू शकतं, तर कदाचित आपण सर्वांनी देखील प्रयत्न करायला हवे.