Python On The Kochi Road Video Viral: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. साप आणि अजगराचे व्हायरल व्हिडीओ यात आघाडीवर असतात. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. असाच एक भला मोठा अजगर रस्त्यावरून जाताना दिसला (Python Road Cross) आणि दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक जागच्या जागी थांबली. रस्त्यावर एकच गर्दी जमली पण अजगर आपल्या ऐटीत रस्ता ओलांडत असताना दिसत आहे. पण जेवण वेळच्या वेळी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) हा संथपणा काही भावला नाही. त्याने धूम स्टाईल आपली गाडी पळवली आणि तेथून कामाच्या ठिकाणी निघाला. ही घटना घटना तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. हा व्हिडीओ राजेश अब्राहम नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर (Twitter Video) केला आहे. हा व्हिडीओ 10 जानेवारीला अपलोड केला असून आता व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजगर रस्ता क्रॉस करत असल्याचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. अजगराने संथगतीने रस्ता ओलांडला आणि त्या बाजूला गेला. 



एका युजर्सने लिहिलं आहे की, "फक्त त्या स्विगी डिलिव्हरी बॉयला वेळेचं महत्त्व आहे. बाकी लोकांकडे वेळच वेळ आहे." दुसर्या युजर्सने लिहिलं आहे की, "लोकांचं खरंच कौतुक त्यांनी एका अजगरासाठी गाड्या थांबवल्या. पण डिलिव्हरी बॉयची अडचण समजू शकतो."