अजब! परीक्षा केंद्रावर 500 मुलींमध्ये एकट्याला पाहून विद्यार्थ्याचं झालं असं काही..., थेट गाठलं रुग्णालय
बिहारमध्ये एका विद्यार्थी परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचला असता तिथे फक्त मुलींन पाहून बेशुद्ध पडल्याची अजब घटना समोर आली आहे. मनिष सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचला असता त्याला सगळीकडे फक्त मुलीच दिसत होत्या. 500 मुलींमध्ये आपण एकटे आहोत हे पाहून त्याची शुद्धच हरपली.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर रोज नवनवे ट्रेंड सुरु असतात. मग ते गाण्यांवर होणारे Reels असो किंवा एखाद्या चिमुकल्याने प्रजासत्ताक दिनाला केलेल्या भाषणाचा व्हिडीओ असू देत. त्यातच शाहरुखचं 'कदम कदम पर लाखो हसिनाये है' हे गाणं तर रिलसाठी तरुणाईचं फेव्हरेट गाणं आहे. मुलींच्या घोळक्यात मुलांनी शूट केलेले व्हिडीओ नेहमी दिसत असतात. पण मुलींच्या गर्दीत आपण एकटेच आहोत हे पाहून एखादा तरुण बेशुद्ध झाल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना...पण बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
इंतर परीक्षेसाठी पोहोचलेला एक विद्यार्थी परीक्षा केंद्रावरच बेशुद्ध झाला. परीक्षा केंद्रावर 500 मुलींच्या घोळक्यात आपण एकटेच आहोत समजल्यानंतर त्याची शुद्धच हरपली. बिहारशरीफ येथे ही घटना घडली आहे. बेशुद्ध पडल्यानंतर विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारशरीफ येथील अल्लामा इकबाल कॉलेजचा विद्यार्थी मनिष शंकरला परीक्षेसाठी ब्रिलियन्ट स्कूल केंद्र म्हणून आलं होतं. सकाळी तो परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचला असता तिथे फक्त मुलीच असल्याचं त्याने पाहिलं. आपल्या आजुबाजूला फक्त मुलीच आहोत हे पाहून मनिषला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला.
मनिषच्या काकीने सांगितलं आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींना पाहून तो घाबरला. यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याला उपचारसाठी रुग्णालयात आणलं.
बिहारमध्ये बुधवारपासून इंटरमीडिएट परीक्षा सुरु झाली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नालंदा जिल्ह्यात परीक्षा केंद्राचा दरवाजा बंद असल्याने विद्यार्थिनी जीव धोक्यात टाकत आत प्रवेश करत असल्याचं समोर आलं होतं.