चित्रपट पाहून खरी खुरी बँक लुटायला गेला, अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
चित्रपट हे नेहमीच प्रेरणादायी असतात, या चित्रपटातून (Thunivu) प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या आयुष्यात बदल करत असतात. असाच एक चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
'या' चित्रपटातून घेतली प्रेरणा
आरोपी सुरेश याने प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार यांचा थुनिवू (Thunivu) चित्रपट पाहून बॅंक लुटण्याचा (Bank Robbery) डाव रचला होता. यासाठी त्याने संपुर्ण प्लॅनिंग केली होती. स्वत: जवळ बंदूक आणि चाकू बाळगले होते. मात्र चोरी करताना त्याच्याकडून एक चुक झाली आणि डाव पुर्ण फसला.
सुरेश याने तामिळ चित्रपट थुनिवू (Thunivu) मधून प्रेरणा घेऊन तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील धारापुरम भागात बँक लुटण्याचा प्रयत्न केला. सुरेश बुरखा आणि मास्क घालून धारापुरम येथील कॅनरा बँकेच्या शाखेत घुसला, त्यानंतर त्याने बँक कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि बंदुक आणि चाकू दाखवून ग्राहकांना धमकावले. त्यामुळे बॅंकेत दहशतीचे (Bank Robbery) वातावरण होते.
असा फसला जाळ्यात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बँकेत फिरत असताना त्याच्या हातातून हत्यार निसटले आणि तो उचलण्यासाठी खाली वाकत असताना काउंटरसमोर थांबलेल्या एका वृद्धाने दरोडेखोरावर वार केला आणि टॉवेलने त्याला पकडले. आरोपीला पकडणाऱ्या वृद्धाचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे.
बँकेत चोरी (Bank Robbery) करण्यासाठी टॉय गन ऑनलाइन खरेदी केली होती आणि डमी बॉम्ब बनवण्यासाठी लाल टेपमध्ये गुंडाळलेला स्विच बॉक्स वापरला होता आणि किचन टाइमर चिकटवला होता, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. वृद्धाने त्याला जमिनीवर फेकल्याने तो जखमी झाला होता.पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करून तपास सुरू केला. अलंगियाम पोलिसांनी सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.