अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.


९७७ उमेदवार रिंगणात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यांत ८९ जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९७७ उमेदवारांचं भवितव्य आज मतदानयंत्रात बंद होणार आहे.


लग्नाआधी केलं मतदान


मतदानासाठी एक जोडपं चक्क लग्नाच्या आधी मतदानासाठी पोहोचले. लग्नाच्या पोशाखामध्येच हे जोडपं मतदानासाठी पोहोचलं. यावेळी ते सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरले.



गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. पहिल्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रुपानी यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलं आहे. मतदानाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंदिरात पूजा अर्चा केली. यानंतर रुपानी यांनी जनतेला मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.


प्रतिष्ठा पणाला


मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, काँग्रेसचे शक्तिसिंग गोहिल, परेश धनानी या दोन्ही पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसलाही आजच निश्चित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.