लग्न म्हटलं की भांड्याला भांडं वाजतंच. ही भांडणं चर्चेतून सोडवावीत असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण काही वेळी ही भांडणं, वाद इतके टोकाचे असतात ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो. विभक्त झाल्यानंतर अनेक जोडप्यांना आपला निर्णय़ चुकीचा होता याची जाणीवही होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये अशीच घटना घडली आहे. घटस्फोटानंतर 12 वर्षांनी जेव्हा पती-पत्नी आमने-सामने आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकत्र होण्याचा निर्णय घेतला. एका विवाहसोहळ्यात आमने-सामने आले असता त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते रडू लागले. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न एकत्र राहू असं ठरवलं. तलाक घेतलेल्या या जोडप्याने अखेर पुन्हा निकाह केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजीम नगर येथे ही घटना घडली आहे. येथील अफसर अलीचा 2004 मध्ये रामपूरमधील एका तरुणीशी निकाह झाला  होता. लग्नानंतर 8 वर्षांनी त्यांचा पत्नीसह वाद झाला. हा वाद इतका वाढला की थेट तलाक घेण्यापर्यंत पोहोचला. यानंतर अखेर एके दिवशी त्याने पत्नीला तलाक देऊन टाकला. 


लग्नानंतर त्यांना तीन मुलगी आणि एक मुलगा झाला होता. तलाक झाल्यानंतर पत्नी एका मुलीला घेऊन गेलो होती. तर दोन मुली आणि एक मुलगा अफसल अलीकडे होते. तलाकनंतर दोघांनीही दुसरं लग्न केलं नाही आणि मुलांसह आपलं आयुष्य घालवत होते. 


पण नशिबात काय लिहिलं आहे याची दोघांनाही कल्पना नव्हती. एका लग्नात दोघांची भेट झाली. यावेळी दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. यानंतर दोघांनी एकमेकाचा फोन नंबर घेतला. फोनवरुन दोघांचं बोलणं सुरु झालं. संवाद साधताना त्यांच्यातील गैरसमज, वाद मिटू लागले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 


दोघांनी पुन्हा एकदा निकाह केला. अशात फक्त पती-पत्नीच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही आई आणि पित्याचं एकत्रित प्रेम मिळू लागले. निकाह केल्यानंतर अफसर अली पत्नी आणि मुलांना घेऊन उत्तराखंडला फिरण्यासाठी निघून गेले. रागात उचललेलं पाऊल अनेकदा चुकीचं असू शकतं हे दोघांनीही मान्य केलं आहे.