न्यायाधीशही हादरल्या: दोन-दोन प्रियकरांना घरी बोलावून मुलीवरच घडवला बलात्कार, आईला 40 वर्षांची शिक्षा
आरोपी आईने आपल्या मुलीला वारंवार आरोपीच्या घरी नेलं. आरोपी तिच्या उपस्थितीच मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
महिलेनेच आपल्या अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचाराचा बळी ठरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये मार्च 2018 ते सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे. केरळमधील विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा आणि 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मानसिक स्थिती योग्य नसल्याने पतीला सोडलं होतं. यानंतर ती शिशुपालन नावाच्या आपल्या प्रियकरासह राहू लागली होती. या काळात शिशुपालनने मुलीवर अनेकदा निर्घृणपणे लैंगिक अत्याचार केले. अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्या होत्या. आरोपी आई मुलीला वारंवार त्याच्या घरी नेत असे आणि तो तिच्यावर अत्याचार करत असते.
मुलीची 11 वर्षांची बहिण घरी आली असता, तिने तिला आपल्यावर अत्याचार होत असल्याचं सांगत सगळा घटनाक्रम उलगडला. शिशुपालनने मोठ्या बहिणीवरही लैंगिक अत्याचार केले. शिशुपालनने त्यांना धमकावलं असल्याने त्यांनी कुठेही याची वाच्यता केली नव्हती. यानंतर एके दिवशी मोठ्या बहिणीने पळ काढून आजीचं घर गाठलं. यावेळी तिची लहान बहिणही सोबत होती. आजीने ही घटना अखेर उघडकीस आली आणि मुलींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तेथे झालेल्या समुपदेशनादरम्यान मुलांनी हा प्रकार उघडकीस आणला.
विशेष सरकारी वकील आरेस विजय मोहन यांनी सांगितलं आहे की, "मुलींची आई दोषी आढळली असून तिला 40 वर्षांची शिक्षा आणि 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या प्रियकराने त्यांच्यांवर लैंगिक आणि निर्घृण अत्याचार केले. आरोपी महिलेचा पती हा मानसिक रुग्ण आहे. यामुळेच ती घर सोडून आपल्या मुलांसह दोन प्रियकरांसोबत राहत होती".
"पहिला प्रियकर, शिशुपालनने मुलगी जेव्हा सात वर्षांची होती आणि पहिलीत शिकत होती तेव्हा तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले. त्यावेळी पीडितेने संपूर्ण घटना आरोपी आईला सांगितली होती. पण तिने काहीही केलं नाही, याउलट दुसऱ्या प्रियकराला तिच्यावर अत्याचार करण्यास मदत केली. न्यायाधीश आर रेखा यांना आढळले की, आरोपी मातृत्वासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि ती माफीची पात्र नाही. तिला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली,” असं ते पुढे म्हणाले.
खटला सुरु असतानाच आरोपी शिशुपालन याने आत्महत्या केली. यामुळे फक्त महिलेविरोधात खटला सुरु होती. मुली सध्या बालसुधारगृहात राहत आहेत. या प्रकरणी एकूण 22 साक्षीदारांची साक्ष पडताळण्यात आली आणि 33 कागपत्रं सादर करण्यात आली.