भारतात रोज अनेक अपघात होत असतात, ज्यामध्ये कित्येक जण आपला जीव गमावतात. अपघातात आपण आणि आपलं कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी कार विकत घेताना अनेकजण सुरक्षेची खातरजमा करतात. कारची सेफ्टी रेटिंग तपासल्याशिवाय कार विकत घेणं अनेकजण टाळतात. पण केरळच्या मल्लपुरम (Malappuram) येथे एक विचित्र अपघात झाला आहे. कारने टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने गुदमरुन मुलीला आपला जीव गमवावा लागला. 2 वर्षाच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर एक वेगळीच शंका आता उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या मल्लपुरम  येथे हा अपघात झाला आहे. चिरमुरडी कुटुंबासह कारमधून प्रवास करत असताना अपघात झाला. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या आणि चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलगी आपल्या कुटुंबीयांसह कोट्टक्कल-पदापरंबू परिसरातून प्रवास करत असताना हा अपघात झाल. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, कारने टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या. 


चिमुरडी आपल्या आईच्या मांडीवर पुढच्या सीटवर बसली होती. अपघातानंतर उघडलेली एअरबॅग तिच्या तोंडावर आली होती. तोंड दाबलं गेल्याने तिचा श्वास गुदमरला आणि मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात कारमधील इतर चौघांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.