उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला असता तरुणाचं गुप्तांगच कापण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे तरुणाच्या प्रेयसीच्या मैत्रिणीने हे कृत्य केलं आहे. तरुणीने शरीरसंबंध ठेवण्याचा आग्रह केला असता, तरुणाने नकार दिला. त्याचा हा नकार ऐकल्यानंतर संतापलेल्या तरुणीने त्याचं गुप्तांग कापलं. यानंतर तरुणाने जखमी अवस्थेत घर गाठलं होतं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला हैलट रुग्णालयात पाठवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपुरातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला होता. यावेळी प्रेयसीने आपल्या एका मैत्रिणीलाही बोलावलं होतं. मैत्रीण पोहोचली असता प्रेयसी आणि प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत होते. यादरम्यान प्रेयसीच्या मैत्रिणीने तरुणाला आपल्याशीही शरिरसंबंध ठेव असा आग्रह करण्यास सुरुवात केली. तरुणाने मात्र विरोध दर्शवला. यामुळे नाराज झालेल्या प्रेयसीच्या मैत्रिणीने त्याचं गुप्तांगच कापून टाकलं. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत तरुणाने घर गाठलं. कुटुंबीय त्याला घेऊन रुग्णालयात गेले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर त्याला हैलट रुग्णालयात रेफर करण्यात आलं. 


चौबेपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील रौतापुरकला गावात राहणाऱ्या तरुणाचे गावातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध होते. महिला विवाहित होती. पण पतीसह वाद झाल्याने ती विभक्त राहत होती. रविवारी रात्री तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. यावेळी प्रेयसीने आपल्या एका मैत्रिणीलाही घऱी बोलावलं होतं. पण तरुणाला याची काही कल्पना नव्हती. प्रेयसीची मैत्रीण आपल्यावर शरिरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली असं तरुणाचं म्हणणं आहे. आपण विरोध केला असता, तिने आपलं गुप्तांग कापून टाकलं. 


पत्नीने पोलिसांनी दिली माहिती


या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. आरडाआरोड ऐकल्यानंतर गावकरी जमा झाले होते. तरुण रक्ताच्या थारोळ्यात धावत घरी पोहोचला होता. तरुणाची ही स्थिती पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरडा सुरु केला होता. यादरम्यान कोणीतरी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात नेलं. तेथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. 


पोलिसांनी तरुणाला तक्रार करण्यास सांगितलं असता त्याने नकार दिला. बदनामीच्या भीतीपोटी तरुण तक्रार करण्याच्या मनस्थितीत नाही. चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय पांडे यांनी सांगितलं आहे की, दोन तरुणांमध्ये भांडण झालं होतं. याचा तपास सुरु आहे.