राहुल गांधी यांच्यासाठी तेजस्वी यादव यांचे ट्विट, काय डोळा मारला मित्रा!
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट आणि त्यांची डोळा मारण्याची पद्धत यांचीच जोरदार चर्चा आहे.
पाटणा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट आणि त्यांची डोळा मारण्याची पद्धत यांचीच जोरदार चर्चा आहे.बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाची तारीफ केलेय. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलेय. व्वा आपण काय भाषण केलेत तसेच छान डोळा मारलाय, मित्रा. लोकसभेतील अविश्वास ठरावाच्यावेळी चांगले भाषण केल्याबद्दल आपले अभिनंदन असे तेजस्वी यादव यांनी म्हटलेय.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. तसेच राहुल गांधी यांनी डोळा मारल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाषण संपल्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याजवळ गेले. राहुल यांनी मोदींचा हात हातात घेतला आणि त्यानंतर त्यांना गळाभेट घेतली. त्यानंतर ते आपल्या जागेवर बसल्यानंतर राहुल यांनी डोळा मारला.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोदींच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी हे गरीब, शेतकऱ्यांसाठी नाही तर सुटाबुटातील लोकांसाठी काम करत आहेत. त्यांच्या हृदयात गरिबांना स्थान नाही तर श्रीमंतांसाठी जागा आहे. मोदी ईमानदार राहीलेले नाहीत, त्यामुळे ते माझ्याशी नरज मिळवू शकत नाही.