पती आणि पत्नीमध्ये चांगले संबंध नसल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं तुम्ही याआधी अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. घटस्फोट होण्यासाठी अनेक कारणं असतात. कौटुंबिक कलहापासून ते विवाहबाह्य संबंध अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विवाहित जोडपी वेगळा होण्याचा निर्णय घेतात. पण पत्नी तृतीयपंथी असल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं नसेल. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असंच एक प्रकरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न केल्यानंतर मधुचंद्राच्या रात्रीच तरुणाला धक्का बसला होता. कारण त्याला त्यावेळी आपली पत्नी पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं होतं. त्याने पत्नीवर उपचार करण्याचे प्रयत्नही केले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. यानंतर तरुणाने थेट घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर कोर्टानेही निर्णय दिला आणि हे घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. तरुणाचं 7 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. 


नेमकं प्रकरण काय?


एत्माद्दौला पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या तरुणाचं 7 वर्षांपूर्वी 2016 मध्ये लग्न झालं होतं. पण मधुचंद्राच्या रात्री तरुणाला आपण जिच्याशी लग्न केलं आहे ती पूर्णपणे महिला नसल्याचं लक्षात आलं. महिलेचं शरीर विकसित झालं नव्हतं. यामुळे तरुणाला धक्काच बसला होता. सुरुवातील त्याला काय करावं हेच कळत नव्हतं. पण नंतर त्याने यासंबंधी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला आणि पत्नीवर उपचार करण्यास भाग पाडलं. 


अनेक महिने पत्नीवर उपचार सुरु होते. पण त्याचा काही फायदाच होत नव्हता. दरम्यान, डॉक्टरांनीही तरुणाला पत्नी कधीच आई होऊ शकत नाही असं सांगितलं होतं. 


तरुणाने सांगितलं आहे की, सुरुवातीला बदनामीच्या भीतीने त्याने कोणालाच काही सांगितलं नाही. पण नंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा मात्र त्याने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. तरुणाने वकील अरुण शर्मा तेहरिया यांच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने अर्ज दाखल करुन घेत सुनावणी केली. जवळपास 7 वर्षं कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यानंतर अखेर निर्णय आला आहे. 


कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे कोर्टाने घटस्फोट मंजूर केला आहे. तसंच हा विवाह अमान्य करत दोघांना घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे.