वायूवेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून पडला तरुण, रेल्वे स्थानकावरील थरारक VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शहाजहानपूर रेल्वे स्थानकावरील (Shahjahanpur Railway Station) एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून तरुण पडला. विशेष म्हणजे यानंतरही तरुण बचावला आहे.
Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा त्यात चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आरपीएफ जवान अनेकदा आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेत असतात. पण आता जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओत एक तरुण तब्बल ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला आहे. तो खाली पडल्यानंतर जवळपास 100 ते 200 किमीपर्यंत फरफटत गेला.
उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथे एक तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुण पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. ट्रेन शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर आली असता तरुण ट्रेनमधून खाली पडला. तरुण जेव्हा पडला तेव्हा ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावत होती.
ट्रेन इतक्या वेगात असल्याने तरुण खाली पडल्यानंतर काही फूट फरफटत गेला. दरम्यान, तरुण पडल्यानंतर स्थानकावर उभे इतर प्रवासीदेखील आश्चर्याने पाहत उभे होते. अनेकांना हे दृश्य पाहून धक्का बसला. यानंतर अनेकांनी तरुणाच्या दिशेने धाव घेतली.
विशेष म्हणजे यानंतरही तरुण व्यवस्थित उभा राहिला. त्याला कोणतीही जखम झालेली नव्हती. दरम्यान, तरुण ट्रेनमधून खाली कसा पडला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
अलीकडेच, पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानांनी एका व्यक्तीला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. तर दुसर्या एका घटनेत, मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये चढताना एक वृद्ध महिला घसरली असता सतर्क पोलिसांनी तिला वाचवलं होतं.