Gujarat Rain: `आता जगण्यासाठी कारणच नाही,` 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....
`आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत,` असं उद्योजकाने सांगितलं आहे.
Gujarat Rain: गुजरातमध्ये सतत पाऊस सुरु असून वडोदरासह अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. आतापर्यंत 18 हजार लोकांना वाचवण्यात आलं असून, 300 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तसंच डेंग्यूने थैमान घातलं असून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 29 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने 30 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसाचं पाणी घऱांमध्ये घुसल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान एका व्यक्तीने पावसामुळे साचलेल्या पाण्यात आपण आपल्या तीन गाड्या गमावल्याचं सांगितलं आहे. वडोदरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या या व्यक्तीने फोटो शेअर केली असून यामध्ये गाड्या पाण्यात अडकल्याचं दिसत आहे. पोस्टनुसार, त्याच्याकडे Maruti Suzuki Ciaz, Ford EcoSport आणि an Audi A6 आहे. ऑडीची किंमत तब्बल 50 लाख आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे या गाड्याचं नुकसान झालं आहे.
"माझ्याकडे आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. मी नमूद केलेल्या माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत," असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. फोटोंमध्ये कार जवळपास पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत.
कमेंट सेक्शनमध्ये युजरने परिस्थिती सांगितली आहे. घराबाहेर जवळपास 8 फूट पाणी होतं आणि कोणीही कार नेण्यासाठी येऊ शकत नव्हतं असं त्याने म्हटलं आहे. "मी तिसऱ्यांदा अशा स्थितीचा सामना करत आहे. याआधी दोन वेळा आधीच्या सोसायटीत अशी स्थिती होती आणि 4 वर्षात पहिल्यांदा या सोसायटीत झालं आहे. बाहेर 7 ते 8 फूट पाणी असून कोणीही पाणी ओसरत नाही तोपर्यंत बाहेर येऊ शकत नाही," असं त्याने सांगितलं आहे.
पुढे, त्याने स्पष्ट केलं की पाणी आतापर्यंत माझ्या घरात 7 इंच आणि माझ्या घराच्या बाहेर सुमारे 4 फूट आहे. संपूर्ण परिसर किंवा संपूर्ण शहर प्रभावित झालं असल्याची माहिती त्याने दिली आहे. ही पोस्ट शेअर केल्यापासून जवळपास एक हजारापेक्षा जास्त जण त्यावर व्यक्त झाले आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, "यासाठी पालिकेला जबाबदार धरता आलं असतं तर बरं झालं असतं. युकेमध्ये असं केलं जातं. अशाप्रकारे आपण पात्र आहोत तशी सेवा मिळवू शकतो. आपली काही चूक नसताना कारचं अशाप्रकारे झालेलं नुकसान पाहून वाईट वाटतं".
दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, "माझी कार चालू असताना मी पुरात अडकलो होतो आणि ती थांबल्यावर पाणी जवळपास खिडक्यांपर्यंत पोहोचले होते. मी काहीही करू शकलो नाही. काही लोकांनी माझी कार पाण्याबाहेर ढकलली. हे 2018 मध्ये घडले. 2 महिने इंजिन दुरुस्ती आणि काही पैसे खर्च केल्यानंतर माझी कार दुरुस्त झाली. त्यामुळे मी सगळं संपलं असं म्हणणार नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आणि निरोगी आहात, या जगात काहीही गमावलेलं नाही".