Drill Machin Fan Viral Video:  सध्या उन्हाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे शहरी भागापासून ते गावागावात उन्हाळ्याच्या झळा सगळ्यांनाच बसत (Jugaad Video) आहेत. शहरी भागात आपण आपल्या घरात बाहेरच्या उन्हाच्या झळा सोसून आलो तरी मस्त एसीमध्ये (AC) बसू शकतो तेव्हा आपल्यालाही फारसा त्रास होत नाही परंतु ज्यांच्याकडे एसी नाही त्यांना मात्र या उन्हाचा फारच त्रास सहन करावा लागतो अशावेळी त्यांना काहीतरी जुगाड करणं हे भागच असतं. त्यातून शहरी भागातही अशा अनेक ठिकाणी एसी नसतो तेव्हा पंख्यावरच त्यांना भागवावे लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक व्यक्ती डोक्यावर ड्रिलिंग मशीन लावून झोपला आहे. हा जुगाड पाहून मोठमोठे इंजिनिअर्सही तोंडातून बोटं घालून पाहत राहिले. (a man makes fan using drilling machine video goes viral)


अनेकदा आपण पाहत असतो की देसी जुगाडाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये कधी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अनेकदा असे व्हिडीओ पाहून युझर्स हैराण होतात. त्यातून अनेकांचे मनोरंजनही होते. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. आता उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा सगळेच उकाड्यापासून वाचण्याचे जुगाड करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. 


या व्हिडीओमध्ये तूम्ही पाहू शकता की, एक माणूस शर्ट काढून झोपलेला दिसतो आहे. तो एक कस्ट्रक्शन साईटवर झोपलेला दिसतो आहे. यावेळी त्याच्या डोक्यावर काहीतरी हलताना दिसत आहे. साहजिकच अशा ठिकाणी एसी किंवा पंखा मिळणं हे दुर्मिळच परंतु या इसमानं चक्क ड्रिलिंग मशीनचा (Drilling Machine) फॅन बनवला आहे. त्यानं हा फॅन एका मशीनला लावला आणि चक्क त्याचा फॅन तयार केला. हा व्हिडीओ @civilengineeriing या युझरनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीलो आतापर्यंत एक कोटी व्हूज मिळाले आहेत आणि 4 लाख लाईक्स मिळाले आहेत. (हा एक व्हायरल व्हिडीओ आहे कृपया तुम्ही असा स्टंट करू नका.)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओ खाली अनेक लोकं नानातऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहे. काहींनी लिहिलंय की, ''हा फॅन जर का खाली पडला तर आत्मा नाही परमात्मा होऊन जाईल''. तर अजून एका व्यक्तीनं लिहिलंय की, ''हे पाहून भलेभले इजिंनिअर्सही फिके पडले आहेत''. त्यासोबत अनेक जण या व्यक्तीची (Trollers) खिल्ली उडवताना दिसत आहेत.