`कामिनी म्हणत होती, तू दुसरी...`, पत्नी आणि सासूच्या हत्येनंतर पतीची धक्कादायक कबुली; डबल मर्डरने हादरलं शहर
उत्तर प्रदेशातील कानपूर डबर मर्डरने हादरलं आहे. एका व्यक्तीने कुऱ्हाडीने पत्नीला ठार केलं. यावेळी वाचवण्यास मधे आलेल्या सासूचीही त्याने हत्या केली. आरडाओरड ऐकल्यानंतर सर्वजण तिथे धावत आले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमधील (Kanpur) फ्रेंड्स कॉलनीत पत्नी आणि सासूची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी जोसेफला अटक केली असून, त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसला नाही. "जेव्हा मी तिला दिल्लीमधील तरुणाशी बोलणं बंद कर असं सांगितलं, तेव्हा कामिनी म्हणाली, तू दुसरी जागा शोध. आम्ही आता त्याच्यासोबतच राहणार," अशी माहिती तिने दिली आहे. कामिनीच्या आईला या सर्व गोष्टींची कल्पना होती आणि तरीदेखील ती तिची बाजी घ्यायची आणि आपला अपमान करायची असं त्याचं म्हणणं आहे.
हेच कारण होतं की जेव्हा पत्नी कामिनीची हत्या करताना सासू मधे आली तेव्हा त्याला त्या अपमानासह सर्व गोष्टी आठवल्या आणि त्याच रागाच्या भरात तिचीही हत्या केली. दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण त्यांना मूलबाळ नव्हते. रेस्टॉरंटमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच आरोपी जोसेफ घरी मग, टी-शर्ट आदींवर छपाईचे काम करायचा. तर सासू पुष्पा या काही दिवसांपूर्वीच लखनौमध्ये वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मोठ्या मुलीच्या घरून येथे आल्या होत्या. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं आहे. पण हे प्रकरण इतकं पुढे जाईल याची कोणतीही कल्पना नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे.
दोन वर्षांपासून सुरु होते विवाहबाह्य प्रेमसंबंध
पोलिसांनी सांगितलं आहे की, कामिनी आणि दिल्लीमधील तरुणामध्ये मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी कामिनीची फेसबुकवरुन दिल्लीतील तरुणाशी मैत्री झाली होती. दोघे बराच वेळ फोनवर बोलत असतं. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले. ऑक्टोबर महिन्यात कामिनी अनेक दिवस घऱातून गायब बोती. परतल्यावर तिला जाब विचारला असता तिने अपमान केला. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनेकदा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचला होता. पण पोलिसांनी समजूत काढून त्यांना पाठवलं होतं.
ई-रिक्षा चालकाने शेजाऱ्याला सांगितलं, नंतर पोलिसांना बोलावलं
दुहेरी हत्याकांड करण्याधी आरोपी जोसेफने शेजारच्या ई-रिक्षा चालकाला स्टेशन जाण्यासाठी बोलावलं. थोडा वेळ थांब, सामान घेऊन येतो असं सांगत तो निघून गेला. पण बराच वेळ झाला तरी तो घऱातून बाहेर आला नाही. यानंतर घऱात आरडाओरड झाल्याचा आवाज ऐकू आला. यानंतर त्याने शेजारी संजीव गुप्ताला सांगितलं. संजीव गुप्ताने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
रात्री कामिनी आपल्या प्रियकराशी फोनवरुन बोलत होता. पतीने रोखलं असता ती भांडू लागली. यावेळी रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने तिला ठार केलं. सासू वाचवण्यासाठी मधे आली असता त्याने तिलाही ठार केलं होतं.
फोन आल्यानंतर काही वेळातच पोलीस अधिकारी अशोक कुमार दुबे घटनास्थळी दाखल झाले. गेट यावेळी आतून बंद होता. पोलीस लॉक तोडून आता पोहोचले तेव्हा घरात कामिनी आणि तिची आई पुष्पा यांचे मृतदेह पडलेले होते. आरोपी जेम्स यावेळी पलंगावर बसलेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी केली जात आहे.