बिहारच्या पश्चिम चंपारणमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात वेडी झालेली एखादी व्यक्ती कोणत्या स्तराला पोहोचू शकते हे यावरुन दिसत आहे. पश्चिम चंपारणच्या नौतन येथे एका प्रियकराने प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर तिचा भाऊ असल्याची खोटी बतावणी करत सासर गाठलं. यानंतर त्याने जे केलं त्यामुळे सासरच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मोठी फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना धक्काच बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर सासरी पोहोचलेली नवविवाहिता सर्व विधी, कार्यक्रम संपल्यानंतर झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेली होती. यावेळी तिच्या वरातीत भाऊ बनून पोहोचेला तिचा प्रियकर तिच्यासह खोलीत झोपण्याचा हट्ट करु लागला. भाऊच आहे असं समजून सासरच्यांनीही त्याला परवानगी दिली. 


लग्नानंतर घरातील विधी, कार्यक्रम संपताना रात्र झाली असल्याने सर्वजण झोपण्याची तयारी करु लागले. यावेळी कुटुंबातील काही सदस्य नवविवाहिता आणि तिचा भाऊ बनून आलेल्या प्रियकराच्या खोलीत गेले असता दोघेही आक्षेपार्ह स्थितीत होते. समोर हे चित्र पाहिल्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. संतापलेल्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यांनी फक्त मारहाणच केली नाही तर त्याचे सगळे केस कापून टाकत टक्कलही करुन टाकलं. 


असं आहे संपूर्ण प्रकरण


मिळालेल्या माहितीनुसार, नौतन प्रखंड कुंजलही गावातील शेखावत हवारी यांचा मुलगा मुश्ताक हवारी याचं 30 ऑक्टोबरला अमवा मंझार येथील एका मुलीशी लग्न झालं. वरात वेळेच कुंजलही गावात पोहोचली आणि सुरळीतपणे हा निकाह पार पडला. या लग्नात मुलीचा प्रियकरही पोहोचला होता. तिची पाठवणी करण्यासाठी तोदेखील तिचा भाऊ असल्याचं सांगत सासरी पोहोचला. 


सासरी पोहोचल्यानंतर भाऊ बनून आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या खोलीत झोपण्याचा हट्ट केला. सासरच्यांनाही तो भाऊ असल्याने सोबत पाठवून दिलं. पण रात्री उशिरा सासरच्यांनी दोघेही आक्षेपार्ह स्थितीत सापडले. यानंतर त्यांनी मारहाण करत त्याचं मुंडन केलं. 


दुसरीकडे नवविवाहिता कुटुंबीयांना फोन करुन आपण लग्नामुळे नाराज असल्याचं सांगत प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट करु लागली. अखेर याप्रकऱणी पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीच्या वरिष्ठ सदस्यांनी नवरामुलगा, नवरीमुलगी आणि तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करत याप्रकरणी निकाल दिला. 


पण मुलगी लग्नाला नकार देत आपल्या प्रियकरासोबत राहण्याच्या हट्टावर अडून राहिली होती. यानंतर पंचायतीने दोन्ही कुटुंबांमधील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली आणि आई-वडील, प्रियकरासह तिला पाठवून दिलं.