उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मुस्लीम तरुणींना (Muslim Girl) बिअर (Beer) खरेदी केल्यानंतर रोषाला सामोरं जावं लागलं. मुस्लीम तरुणांनी या तरुणींना भररस्त्यात अडवलं आणि जाब विचारत खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी तिथे उपस्थित तरुण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक तरुण तरुणीला मी तुझा शिरच्छेद करेन, मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी धमकी देताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोन मुस्लीम तरुणी बुरखा घालून वाइन शॉपमध्ये बिअर खरेदी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी बाजारातील काही तरुणांची नजर या तरुणींवर पडली. यानंतर समाजाचा ठेका घेतलेल्या या तरुणांचा संताप झाला आणि त्यांनी रस्त्यातच या तरुणींना रोखलं. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना खडे बोल सुनावत हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. 


यावेळी एक तरुण तर तरुणीला तुझा शिरच्छेद करेन असं धमकावलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार तरुण तरुणींना विचारत आहेत की, नेमकी काय हतबलत आहे. तुम्ही मार्केटमध्ये येऊन दारु खरेदी करणार का? यावर तरुणी त्यांना ही तर फक्त बिअर आहे असं सांगते. 



त्यावर तरुण म्हणतो की, आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवत नाही आहोत. पण आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आताच तुम्हा दोघींना मारुन टाकेन, मग मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. इथेच तुमचा गळा कापून टाकेन. माझ्यावर अशाच प्रकरणांमध्ये 4-5 गुन्हे दाखल आहेत. बुरखा घालून बिअर खरेदी करत आहेत. हिंदूसमोर आमचा अपमान होत आहे. 



व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे ओळख पटवत आरोपी आदिल, साजिद आणि बाकू उर्फ शाहनवाज यांना अटक केली आहे. आदिल आणि साजीद हे सख्खे भाऊ असल्याची माहिती मिळत आहे. 


घटनेची माहिती देतना अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, एका व्हायरल व्हिडीओत काही तरुण मुस्लीम तरुणीचा शिरच्छेद करण्याची धमकी देत होते. या घटनेची दखल घेत कोतवाली पोलिसांनी 3 लोकांना अटक केली आहे. तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपींना कोर्टात हजर करत जेलमध्ये पाटवण्यात आलं आहे.