Crime News : कायद्याचं रक्षक करणारेच जर त्यांचं कर्तव्य विसरून भक्षक झाले तर सर्वसामान्य लोकांनी कसा विश्वास ठेवायचा. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने एका विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रूपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  (married women constable agian wedding)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणामधील रोहतक येथील शिवाजी कॉलनी पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलने 20 वर्षाच्या आयटीआय करणाऱ्या मुलाला लिव्ह इनचं आमीष दाखवत त्याच्यासोबतच खोटं लग्न करण्याचा बनाव रचला. त्यानंतर  त्याचे 5 लाख रूपये उकळले. 


नेमकं काय आहे प्रकरण?
पीडित तरूण एका केसमुळे पोलीस ठाण्यामध्ये गेला होता. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलसोबत त्याची ओळख झाली. महिला कॉन्स्टेबलने त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्यांचं बोलणं चालू झालं, त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने पीडित मुलाला आपण अविवाहित असून तुझं आधारकार्ड घेऊन ये.


आपण त्यावरील तुझं वय वाढवून लिव्ह इनमध्ये राहू त्यानंतर आपण दोघं लग्न करू असं म्हणत मुलाला विश्वासात घेतलं 29 ऑक्टोबर 2021 ला दोघांनी लग्न केलं होतं. 


पीडित मुलाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या मुलाचं अपहरण करत त्याची गाडीही जप्त केली होती. याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पीडित मुलावर दबाव टाकण्यात आला. महिला कॉन्स्टेबलने गावाकडचं घर विकून 5 लाख रूपये आणि दागिने घेतले होते. दरम्यान, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलीस विभागाने महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे.