Crime News: भाचा सारखा घरी यायचा, मामाला आली शंका, नंतर एक दिवस पाहिलं तर मामीसोबत....
मामीसह असणाऱ्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी भाच्यासह मामीलाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान भाच्याने गुन्हा कबूल करताना अनेक खुलासे केले आहेत.
Crime News: मेरठच्या (Meerut) सरुरपूर येथील हेअर सलूनचा मालक संदीप बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांना तपासादरम्यान, भाचा जॉनी यानेच गोळ्या घालून आपल्या मामाची हत्या (Murder) केल्याचं समोर आलं आहे. आरोपी भाचाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतातून मृतदेह मिळवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनीचे संदीपची पत्नी म्हणजेच मामीसह अनैतिक संबंध होते. पोलिसांनी जॉनी आणि संदीपच्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
32 वर्षीय संदीप डाहरा गावचा रहिवासी होता. त्यांचं हेअर सलून होतं. २ फेब्रुवारीला संदीप आपल्या हेअर सलूनमध्ये होता. यावेळी त्याच्या मोबाइलवर एक फोन कॉल आला आणि तो दुकानातून निघून गेला. यानंतर संदीप पुन्हा घरी परतलाच नाही. दोन दिवस नातेवाईक त्याचा शोध घेत होते. अखेऱ शनिवारी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे भाचा जॉनीला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता सगळा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी संदीपची पत्नी आणि जॉनीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता दोघांमध्ये वारंवार बोलणं झाल्याचं उघड झालं.
चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अविवाहित जॉनीचं वारंवार संदीपच्या घरी येणं जाणं सुरु होतं. यादरम्यान त्याचे मामी प्रितीसह प्रेमसंबंध जुळले. संदीपने दोघांना एकत्र पाहिलं होतं. यानंतर त्याने दोघांनाही ताकीद दिली होती. संदीप मधे येत असल्याने जॉनी आणि प्रितीने त्याला रस्त्यातून हटवण्यासाठी कट आखला.
जॉनीने गुरुवारी दुपारी संदीपला फोन करुन बहाणा करत हायवेला बोलावंलं. यानंतर त्याची हत्या करत मृतदेह शेतात लपवला. संदीपची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप आणि प्रिती यांचं तीन वर्षांपासून लग्न झालं होतं. पोलिसांनी प्रितीलाही ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात जॉनी आणि प्रिती यांच्यात प्रेमसंबंध असल्यानेच ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र अजून काही कारण आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.