गरोदर प्रेयसीला ठार करुन गाडलं; पोलिसांनी कारण विचारलं तर म्हणतो, `ती फार...`; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काय घडलं
पोलिसांनी आरोपी संजू आणि पंकज यांना अटक केली आहे. आपणच 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
दिल्लीत एका तरुणाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने 19 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आहे. 19 वर्षीय तरुणी गरोदर होती आणि लग्नासाठी दबाव टाकत होती. आरोपी तरुणाला मात्र हे मूल नको होतं आणि तिने गर्भपात करावा अशी त्याची इच्छा होती. यातूनच त्याने प्रेयसीच्या हत्येचा कट आखला आणि तिला मित्रांच्या मदतीने ठार करुन गाडून टाकलं.
19 वर्षीय सोनी पूर्व दिल्लीमधील नागलोईची रहिवासी होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होती. तिचे जवळपास 6 हजार फॉलोअर्स होते. सोशल मीडियावर तिने आपला प्रियकर संजू उर्फ सलीमसह अनेक फोटो पोस्ट केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीमनेही इंस्टाग्रामला तिच्यासह अनेक फोटो पोस्ट केले होते.
सोनीच्या कुटुंबीयांनी तिची एका मुलासह मैत्री असल्याची कल्पना होती. पण जेव्हा कधी ते तिच्याकडे त्याच्याबद्दल विचारत असत तेव्हा ती भूत आहे असं उत्तर देत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी सात महिन्यांची गरोदर होती. ती सलीमवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण तो यासाठी तयार नव्हता आणि गर्भपात करावा अशी इच्छा होती. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. सोमवारी ती काही गोष्टी घेऊन सलीमला भेटण्यासाठी गेली होती.
सलीम आणि त्याचे दोन मित्र सोनीला घेऊन हरियाणच्या रोहतकला घेऊन गेले. तिथे त्यांनी तिची हत्या केली आणि मृतदेह पुरुन टाकला. पोलिसांनी सलीम आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. दुसरा मित्र मात्र फऱार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
नेमकं काय झालं हे 10 मुद्द्यात समजून घ्या -
1) दिल्ली पोलिसांना 22 ऑक्टोबर रोजी मुलीच्या भावाकडून त्याची बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. तिच्या बहिणीच्या मित्राच यात सहभाग असावा, असा त्याला संशय होता.
2) तक्रार आल्यानंतर लगेचच या हत्येच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली. तरुणाचा फोन यादरम्यान स्विच ऑफ होता.
3) दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत संजू आणि पंकजला अटक केली असून त्यांनी गरदोर असणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली आहे.
4) अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत 21 ऑक्टोबर रोजी एक कार भाड्याने घेतली होती आणि पीडितेला तिच्या काही सामानासह नेलं होतं अशी कबुली दिली आहे.
5) तरुणीला संजूसोबत लग्न करायचे होतं, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आला. मात्र तो अधिकाऱ्यांकडे थोडा वेळ मागत राहिला.
6) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवा चौथच्या दिवशी पीडिता उपवास करत असताना तिचं संजूशी भांडण झालं आणि त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला.
7) भांडणानंतर आरोपी संजूने त्याचे मित्र पंकज आणि रितिकला लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी कारची व्यवस्था करण्यास सांगितले.
8) ते सर्वजण कारमध्ये चढले आणि हरियाणाच्या रोहतकच्या दिशेने निघाले. त्यांनी पीडितेची हत्या केली आणि तिचा मृतदेह रोहतक जिल्ह्यातील मदिना येथे एका पडक्या भागात चार फूट खोल खड्ड्यात गाडला, असं पोलिसांनी सांगितलं.
9) मदिना येथील पडक्या भागातील खड्ड्यातून 19 वर्षीय पीडितेचा मृतदेह सापडला.
10) पोलीस या प्रकरणातील तिसरा आरोपी ऋतिक याचा शोध घेत असून, पीडिता गर्भवती असल्याचा दावाही कुटुंबातील काही सदस्य करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.