नवी दिल्ली : गुजरातच्या दारू माफीयांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शेजारील राज्यांमधून दारूची तस्करी करण्याचं नियोजन केलंय.


गुजरातमधली दारूबंदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदी आहे. पण निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा उमेदवारांनी आणि राजकीय नेत्यांनी मतं मिळवण्यासाठी दारूचा पाऊस पाडण्याचा घाट घातला आहे. 


मतांसाठी दारू


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दारूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून दारू माफीया त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायेत.
गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे दारूसाठी कोड वर्डचा वापर केला जातोय. दारूच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळ्या कोड वर्ड ठेवला गेलाय. ती नावंसुद्धा गंमतीशीर आणि कल्पक आहेत.
गुजरातमध्ये दारू प्यायची असेल तर आधी ही कोड वर्ड पाठ करा
त्यातले काही नमुने बघुया,


कोड वर्ड:


काला खट्टा - व्हिस्की


निंबू पानी - व्होडका


टॉनिक - जीन


सिरप / दवा - रम


गठीया - बियर


किशमीश - वाईन


शेजारच्या राज्यांमधून पुरवठा


शेजारच्या महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमधून दारूची तस्करी केली जातेय. त्यातही मुख्यत: महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, नंदुरबार इथून दारूची तस्करी केली जातेय.



दारूच्या तस्करीत वापरले जाणारे आणखी काही कोड वर्ड म्हणजे,


काका - पोलिस
मेहमान - पब्लिक
शादी - डिलीवरी लोकेशन
1 किलो - 1 क्रेट
फाफरा - फूल बॉटल