`यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...`, छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो `यांना कितीही...`
बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे एक वयस्कर व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सुनेच्या नावे करण्यासाठी पोहोचला होता. यामुळे छोटा मुलगा आणि त्याची पत्नी नाराज होते. याप्रकरणी छोट्या मुलाने कोर्टात पोहोचून वडिलांना मारहाण सुरु केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे मुलानेच आपल्या वयस्कर वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सूनेच्या नावे करण्यासाठी पोहोचले होते. रजिस्ट्री करण्यासाठी ते आले असताना छोट्या मुलाने त्यांना कोर्ट परिसरातच पळवून पळवून मारहाण केली. यानंतर कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली होती. तिथे उपस्थित एका व्यक्तीने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वडील जमीन मोठ्या सूनेच्या नावे करत असल्याने छोटा मुलगा आणि सून नाराज होते आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला.
मांझागड पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या छवही गावात राहणारी वयस्कर व्यक्ती आपल्या मोठ्या मुलाची बायको म्हणजेच त्यांच्या सूनेच्या नावे वडिलोपार्जित जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी पोहोचले होते. याचवेळी त्यांचा छोटा मुलगा पत्नीसह कोर्ट परिसरात दाखल झाला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण कऱणाऱ्या छोट्या मुलाने आरोप केला आहे की, त्याच्या वडिलांचे 20-25 वर्षांपासून मोठ्या सूनेशी अनैतिक संबंध होते. याचमुळे ते तिच्या नावे जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी दाखल झाले होते. छोट्या मुलाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते ऐकण्यास तयार नव्हते. यानंतर त्याने त्यांना मारहाण केली.
आरोपी तरुणाने आरोप केला आहे की, याआधीही मोठ्या वहिनीच्या नावे चुकीच्या पद्धतीने जमिनीची रजिस्ट्री करण्याचा प्रयत्न झाला आहे. वडील आपली सर्व संपत्ती सूनेच्या नावे करत असल्यानेच त्यांना मारहाण केल्याचं त्याने कबूल केलं आहे.
डीएसपी विजय कुमार मिश्रा यांनी माहिती देतान सागितलं आहे की, 20 जूनला एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये एक मुलगा आपल्याच वडिलांना मारहाण करत आहे. या व्हिडीओचा तपास केला जात आहे. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल.