``टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला``; माणूसकीचे जिवंत उदाहरण
viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो!
Taxi Driver Gives Lost Mobile Back: आपण कधी कधी आपल्या कामात इतके बिझी असतो की आपण जर का सार्वजनिक वाहतूकीनं आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो आणि अनेकदा घाईघाईत टॅक्सीतून उतरताना आपल्यालाही कळतंही नाही की आपण आपला फोन टॅक्सीतच कधी विसरलो ते. अनेकदा आपण मस्त आरामात टॅक्सीतून जात असतो तरीही मोबाईल नाहीतर आपली आवडती वस्तू आपण टॅक्सीत विसरून जातो. त्यातून आपल्याला तो मोबाईल किंवा ती वस्तू कधी मिळेल याची काहीच शाश्वती नसते. त्यातून मोबाईल सारखी वस्तू आजच्या जमान्यात हरवली तर काहीच करता येत नाही अशी आपली समजूत असते. त्यातून त्या ड्रायव्हरनं काही वेडवाकडं केलं तर? मग असे नानाविध प्रश्न सुचल्यावाचून आपल्याकडे काहीच पर्याय उरत नाही.
कधी कोण आपला मोबाईल लंपास करेल याचीही आपल्यालाही शाश्वती नसते त्यातून कोणी जर का त्याचा गैरवापर केला तर, अशावेळी माणसांवर विश्वास ठेवणं आणि कोणी आपल्याला माणूसकी दाखवेल अशी अपेक्षा करणं तर दुरच... परंतु ही घटना ऐकल्यावर कदाचित तुमचं मतं बदलेल, या जगात माणूसकी आहे यावर तुम्हालाही विश्वास बसेल. सध्या अशाच एका टॅक्सी ड्रायव्हरची सर्वत्र चर्चा आहे. हा टॅक्सी ड्रायव्हर माणूसकीला पुरेपुर धरून राहिला आणि त्यानं आपल्या टॅक्सीतून जेव्हा एका प्रवाशाचा मोबाईल फोन तो गाडीतच विसरला होता तेव्हा त्या मोबाईलला अजिबात स्पर्श न करता त्यानं तो मोबाईल त्याच्या मालकाला सुपूर्द केला, परंतु हा मोबाईल त्यानं त्या इसमाला परत कसा केला? कारण टॅक्सीतून प्रवास करताना काही कोणीच आपल्याला ओळखत नसतं. तेव्हा या लेखातून याचा टॅक्सी ड्रायव्हरनं दाखवलेल्या माणूसकीबद्दल आणि त्याच्या हुशारीबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
हेही वाचा - सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
एका फिटनेस कॉचनं याबाबत ट्विट केलं आहे. शाजन सॅम्यूल आणि त्याचा मित्र विवेक यांनी दिल्लीच्या आईजीआई एअरपोर्टवरून मेरू कॅब बुक केली. तेव्हा अत्यंत उशीरा रात्रीची वेळ होती. तेव्हा दुर्देवानं विवेकनं म्हणजे शाजनच्या मित्रानं त्याचा फोन कॅबमध्ये ठेवला. तो चूकुन तो फोन आपल्यासोबत घेऊन जायचा विसरला. त्यातून त्या दोघांजवळ त्या कॅ ब ड्रायव्हरचा फोनही नव्हता. त्यातून त्या दोघांना आता वाटेलच होते की त्याचा फोन आता काही परत मिळणार नाही. पण चूक झाली तर झाली ती तर सुधारायला हवीच. तेव्हा त्यांना हार नाही मानली. त्यांनी त्यांचा फोन परत मिळवा म्हणून प्रयत्न सुरू केले.
परंतु पुढे जे झालं ते त्या दोघांच्याही कल्पनेच्या पलीकडील होते कारण ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्याठिकाणी चक्क तो टॅक्सी ड्रायव्हर विवेकचा फोन घेऊन पोहचला होता. ते दोघं त्याच्यावर खूप खुश झाले आणि त्या दोघांनी त्याला काहीतरी भेट देण्याचेही ठरविले.
टॅक्सी ड्रायव्हरनं काय शक्कल लढविली?
यावेळी शाजन सॅम्यूलनं ट्विटमध्ये लिहिलंय की, ''आम्ही काल रात्री उशिरा दिल्ली एअरपोर्टवरून मेरू कॅब बुक केली. माझ्या सहकाऱ्याचा विवेकचा फोन त्या कॅबमध्ये विसरल्यानं तो हरवला. आमच्याकडे त्या ड्रायव्हरचा नंबर नव्हता. आम्हाला वाटलंच की आता काही तो फोन परत मिळणार नाही परंतु आम्ही हार नाही मानली. परंतु आश्चर्यच झाले, तो ड्रायव्हर ज्याचे नावं हिरालाल मंडल असे होते तो तो फोन घेऊन आमच्यापर्यंत पोहचला. यापुर्वीही त्यानं जेव्हा एका विदेशी प्रवाश्याची बॅग हरवली होती तेव्हा त्यानं ती परत केली होती. यानं आज माणूसकी दाखवली, लक्षात ठेवा.''