राहुल कांबळे / मुंबई : Teacher has built a car that runs on solar energy : जम्मू-काश्मीरच्या सनत नगरमध्ये राहणाऱ्या एका शिक्षकानं सौर ऊर्जेवर चालणारी कार तयार केलीय. बिलाल अहमद, असं या शिक्षकाचं नाव आहे. ही कार तयार करण्यासाठी बिलाल यांनी तब्बल 11 वर्ष अथक प्रयत्न केलेत. त्यासाठी त्यांना 15 लाख रुपयांचा खर्च आला. मारूती 800 या कारला मॉडीफाय करत त्यांनी हा अविष्कार सादर केलाय. स्पोर्ट कारमध्ये केवळ दोघे बसू शकतात. मात्र, या कारची आसन क्षमता चार इतकी आहे. गणित विषयाचे शिक्षक असलेले बिलाल यांनी कार डिझाईनचं शिक्षण घेतलंय. कार तयार करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कुणाचीही आर्थिक मदत मिळाली नाही. मदत मिळाली असती तर मी भारताचा अ‍ॅलन मस्क बनलो असतो, अशी भावना बिलाल व्यक्त करतात.


कोठून मिळाली प्रेरणा  ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिलाल अहमद पेशानं शिक्षक आहेत. कारची आवड असल्यानं त्यांनी कार उत्पादन आणि मशिन्सचा अभ्यास केला. बॅक टू द फ्यूचर या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या डिलोरियन कारपासून त्यांना प्रेरणा मिळाली. अथक परिश्रमानंतर बिलाल यांचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं.


कमी उन्हापासून अधिक ऊर्जा 



पेट्रोल आणि डिजेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता, बिलाल यांनी सौर ऊर्जेवर चालणारी कार तयार करणाचा निश्चिय केला होता. त्यासाठी त्यांनी चेन्नईतून एक सोलर पॅनल मागवलं आणि कमी उन्हापासून अधिक ऊर्जा तयार करणारं पॅनल निवडलं. जम्मू-काश्मीरमध्ये उन्हाची तीव्रता कमी असते, त्यामुळे मोनोक्रीस्टलाईन सौर पॅनलचा वापर फायदेशीर ठरतो, असं स्पष्टीकरण बिलाल यांनी दिले आहे. 


कारच्या दरवाज्यात सौर पॅनल 


कारच्या पुढे आणि मागे सोलार पॅनल लावण्यात आलेत. त्याचबरोबर दरवाज्याच्या वरच्या भागात सोलार पॅनल लावण्यात आले आहेत. मर्सिडीज, फेरारी, बीएमडब्ल्यू या सारख्या गाड्यांतून फिरणं अनेकांचं एक स्वप्न असतं. परंतु, या गाड्या ऐवढ्या महाग आहेत की अनेकांचं स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळं या अशा लोकांना लग्झरीयस फील देण्याची इच्छा बिलाल बोलून दाखवतात.


देशभरात इनोव्हेशनचं कौतुक


बिलाल यांनी केलेल्या कामाचं देशभरात कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियातून अशरक्ष: स्तुती सुमने उधळली जात आहेत. बिलालला कार उत्पादनात सरकारनं मदत करावी, अशी मागणी अनेकजण करत आहेत.