पैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने नवऱ्याला लाथा बुक्क्यांनी तुडवंल; VIDEO व्हायरल
Viral Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) पैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने पतीला आधी बांधलं आणि नंतर काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये तिला तिच्या बहिणीनेही साथ दिली. पत्नी पतीला बांधून मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Viral Video: संसार म्हटला की त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. संसाराचा गाडा हा दोघांनीही त्याच वेगाने ओढायचो असतो, अन्यथा एकाच्या खांद्यावरील ओझं वाढतं. संसारात सर्वात महत्त्वाची गोष्ट असतो ती म्हणजे घऱखर्च. त्यातर जर कमी जास्त झालं तर सगळा डोलारा हालतो. यावरुन अनेकदा जोडप्यांमध्ये भांडणही होत असतं. पण उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका पतीला आपल्या पत्नीकडे खर्चाचा हिशोब मागणं फारच महागात पडलं. नवऱ्याने हिशोब मागितल्याने संतापलेल्या पत्नीने आपल्या बहिणीच्या सहाय्याने आधी त्याला बांधलं. नंतर लाठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अकबरपूर कोतवाली क्षेत्राच्या बाढापूर गावातील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही महिला एका व्यक्तीचे हात यांचे पाय बांधून त्याला लाठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाढापूर गावात राहणारा शिवकुमार बनारसमध्ये भावासह कुल्फी विकण्याचं काम करतो. तो दर महिन्याला घरखर्चासाठी पत्नीला पैसे पाठववत होता. शिवकुमार जेव्हा बनारस येथून घरी आला तेव्हा त्याला पत्नीने 8 क्विंटल गहू विकले असल्याचं समजलं. यामुळे त्याने पत्नीला गहू विकण्याचं कारण विचारलं. तसंच बनारसमध्ये असताना पाठवलेल्या 32 हजारांचा हिशोब मागितला.
शिवकुमारने हिशोब मागितल्याने त्याची पत्नी सुशीलाला राग आला. यानंतर तिने बहिणीच्या मदतीने पतीचे हात पाय बांधले. यानंतर लाठ्यांनी त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी शिवकुमार जीवाच्या आकांताने ओरडत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अकबरपूर कोतवाल सतीश सिंह यांनी सांगितलं आहे की, शिवकुनार याने स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.