उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची हत्या आली होती. घरामध्ये पत्नी आणि मुलगा असून हत्येनंतर खळबळ उडाली होती. पण जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. याचं कारण पतीच्या हत्येचा कट इतर कोणी नाही तर पत्नीने आखला होता. मृत पतीने दत्तक घेतलेला मुलगा आणि गावातील एका व्यक्तीला सोबत घेऊन तिने पतीची हत्या केली होती. गावातील व्यक्तीला तिने अडीच लाखांची सुपारी दिली होती. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या हत्येमागे अनैतिक संबंध कारणीभूत आहेत. मृत व्यक्तीच्या पत्नीने दत्तक घेतलेल्या मुलासहच संबंध होते. तिच्या पतीला याची माहिती मिळाली होती. जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा पत्नीने त्याला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला. मारेकऱ्याला 27 हजारांचा अॅडव्हान्स देण्यात आला आणि रात्री घरात रक्ताचा सडा पाडण्यात आला. पती झोपेत असतानाच त्याची हत्या करण्यात आली. 


12 नोव्हेंबरला मनोज जाटव यांचा त्यांच्याच घऱात संशयितरित्या मृतदेह आढळला होता. मनोज यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता मनोज यांनी गावातील 23 वर्षीय राहुल कुमारला दत्तक घेतल्याचं उघड झालं. तसंच राहुल आणि मनोजची पत्नी यांच्या अनैतिक संबंध असल्याची माहितीही मिळाली. 


अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मनोज यांची त्यांची पत्नी आणि मुलाने 15 नोव्हेंबरला रात्री हत्या करण्याची योजना आखली. गावातील विकास जाटव याला अडीच लाखात हत्येची सुपारी देण्यात आली होती. यासाठी त्याला 27 हजारांचा अॅडव्हान्स देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि मुलगा राहुलला अटक केली आहे. दरम्यान विकास फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.