आंध प्रदेशात (Andhra Pradesh) महिलेने प्रियकरावर चाकूने हल्ला करत त्याचं गुप्तांग जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता. पत्नी आपल्यासह राहत नसल्याने विजय कुमार यादव कमावलेले सर्व पैसे तिला पाठवत होता. यामुळे सीता कुमारी नाराज झाली होती. तिने त्याचे डोळे, हात बांधले; मोबाईल काढून घेतला आणि नंतर गुप्तांगावर हल्ला केला. घर सोडण्यापूर्वी तिने घरमालकाला फोन करुन माहिती दिली असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय कुमार यादव आपली योग्य काळजी घेत नसल्यानेही आरोपी महिला नाराज होती. यामुळेच तिन तो झोपेत असताना त्याच्यावर हल्ला केला. उदरनिर्वाहासाठी विजय तोरागुडीपाडू गावात दुग्धव्यवसाय करत होता. विजय आणि सीता दोघेही बिहारचे रहिवासी आहेत.


पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, "सीता कुमारी आणि विजय यादव गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत होते. विजयच्या गुप्तांगावर हल्ला केल्यानंतर महिला तेथून निघून गेली होती. यानंतर तिने घरमालकाला फोन करुन माहिती दिली. आम्ही नेमकं काय झालं याची माहिती घेत आहोत".


विजयने सांगितलं आहे की, "मी कमावलेले सर्व पैसे घरी पाठवत होतो आणि यावर सीता नाराज होती. मी जेवल्यानंतर झोपायला गेलो असता, सीताने माझ्यावर हल्ला केला".


अशाच एका घटनेत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 26  वर्षीय तरुणीने तिच्या प्रियकरावर चाकूने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखमी केले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी भिवंडीत घडली, असं एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. पाडित तरुणाने घरातून पळ काढला आणि रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू आहे.