जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली पत्नी, तपासणीदरम्यान गुप्तांगात सापडलं असं काही की पोलीसही चक्रावले
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं.
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये असलेल्या पतीचं ड्र्ग्जचं व्यसन पत्नीला महागात पडलं आहे. पतीला देण्यासाठी ती लपवून चरस घेऊन जात असताना पोलिसांनी तिला अटक केली. हा सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले होते. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती ड्रग्जच्या आहारी गेला आहे. त्याने पत्नीकडे चरस देण्याची मागणी केली होती. पत्नीनेही त्याची मागणी पूर्ण करण्याचं ठरवलं. यासाठी तिने चक्क आपल्या गुंप्तागात 8 ग्रॅम चरस लपवलं आणि जेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिला रोखलं आणि तिथे तैनात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तिची तपासणी कऱण्यास सांगितलं. तपासणी घेतली असता तिच्याकडे चरस सापडलं. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.
अमरोहाच्या हसनपूर येथे राहणार गुलशेर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली जेलमध्ये बंद आहे. गुलशेर हा व्यसनाच्या आहारी गेला असून, त्याला चरसचं व्यसन आहे. तो व्यसनाच्या इतका आहारी गेला आहे की, त्याला जेलमध्ये राहावत नाही आहे. आपली हीच इच्छा पूर्ण करण्याच्या नादात त्याने आपली पत्नी अलमिनालाही जेलमध्ये पाठवलं आहे.
अलमिना जेव्हा कधी जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी येत असे तेव्हा गुलशेर तिच्याकडे चरस आणण्याची मागणी करत असे. सुरुवातीला अलमिना नकार देत होती. मात्र तो जास्त दबाव टाकू लागल्यानंतर ती जेलमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी तयार झाली. दोन दिवसांपूर्वी अलमिना जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने आपल्या गुप्तांगात 8 ग्रॅम चरस लपवलं होतं.
पण ती जेलमध्ये पोहोचली असता पोलीस कर्मचाऱ्यांना शंका आली. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तिची तपासणी करण्यास सांगण्यात आलं. यावेली तिच्याकडे चरसचं पाकिट सापडलं. यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण ती गुप्तांगात लपवूनहे चरस आत घेऊन चालली होती. चरस सापडल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि स्थानिक पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिला जेलमध्ये पाठवलं आहे.