विश्वासच बसेना... सोन्यापेक्षा महाग एक किडा, पण का?
सोन्यापेक्षा महाग एक किडा... दागिने खरदी करायचे की किडा?
मुंबई : कीटक हे पक्ष्यांचं आवडते खाद्य असते. पण कीटक खाल्ल्याने कॅन्सर आणि दम्याचा धोका कमी होतो, माणसातील अशक्तपणाही दूर होतो.. असा दावा जर कोणी केला तर माणूस त्या कीटकाला आपला आहार बनवण्यासाठी व्यक्ती मागेपुढे पाहाणार नाही. हिमालयाच्या उंच टेकड्यांवर आढळणारा एक तपकिरी किडा या धोकादायक आजारांवर उपचार करतो.
यारसागुंबा असं किड्याचं नाव आहे. दोन तिबेटी शब्दांना मिळून यारसागुंबा हा शब्द तयार झाला आहे. यार्सा म्हणजे उन्हाळी अळी आणि गुंबा म्हणजे उन्हाळी वनस्पती.
हिमालयात आढळणाऱ्या औषधी वनस्पतीचे वैज्ञानिक नाव 'कॉर्डीसेप्स सायनेन्सिस' आहे. हिमालयीन प्रदेशात बर्फाळ पर्वतांवर तीन ते पाच हजार मीटर उंचीवर आढळतो.
यारसागुंबाचा शोध सुमारे 15शे वर्षांपूर्वी लागला होता. तिबेटच्या लोकांना याची प्रथम कल्पना आली. गुपित समजल्यानंतर चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये यारसागुंबाची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे यारसागुंबाची किंमत गगनाला भिडली.
येरसागुंबाचा व्यवसाय करणारे शेतकरी रातोरात श्रीमंत झाले. 2008 मध्ये, यारसागुंबा 60 लाख रुपये प्रति किलोपर्यंत विकला गेला, म्हणजे सोन्यापेक्षा महाग. आजही खरेदी करणारेएक किलो येरसागुंबासाठी 15 ते 20 लाख रुपये मोजतात.