Aadhaar Card : भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. नोकरी (Job) पासून ते घर खरेदीपर्यंत आधार कार्ड गरजेचे असते. परंतु, मागील काही काळापासून आधार कार्डशी संबंधित फसवणुकीचे (Aadhaar Card Fraud) प्रमाण वाढले आहे. त्यासाठी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही तुमच्या आधार कार्डची छायाप्रत (Aadhaar Card Photocopy) कधीही इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. असे केल्याने भविष्यात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


वाचा : तब्बल 8 वर्षांनंतर T20 World Cup मध्ये 'हा' बलाढ्य संघ भारताशी भिडणार, नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल


गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड चुकीच्या कामांसाठी वापरले गेले आहे. जर तुम्ही सार्वजनिक डोमेनमध्ये (Public domain) वापरल्या जाणार्‍या संगणकावर तुमचे ई-आधार (E-Aadhaar) डाउनलोड करत असाल. अशा परिस्थितीत, फाइल डाउनलोड केल्यानंतर, त्याच वेळी आधार कार्डची सॉफ्ट कॉपी हटवण्यासाठी तिचा वापर करा. जर तुम्ही हे केले नाही अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डच्या सॉफ्ट कॉपीचा गैरवापर होऊ शकतो.


तुमच्या आधार कार्डाच्या सुरक्षिततेसाठी ते लॉक करून ठेवा. mAadhaar अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करू शकता. तथापि, ते पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिकची आवश्यकता असेल. याशिवाय आधार कार्डच्या सुरक्षेसाठी तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड वापरावे.