नवी दिल्ली : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाचा आधार क्रमांक आणि जन्मदाखल्याची आवश्यकता भासणार आहे. लहान मुलांसाठीचे हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता भासणार आहे. 



सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता हा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती युआयडीआयने ट्विटरद्वारे दिलीय. दरम्यान संबंधित मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागणार आहे. मूल सात वर्षांचे होईपर्यंत जर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास निळ्या रंगाचे आधारकार्ड आपोआप रद्द होईल.