Aadhar Card Update : देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधारकार्ड (Aadhar Card) हा विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा समजला जातो. आधार केंद्रांवर नवीन आधार काढण्यासह कार्डावरील छायाचित्र, पत्ता, नावातील बदल करण्याचे काम केले जाते. मोबाईल क्रमांक आधारकार्डला लिंक (Aadhar Card Link) करणे, तर, आधारकार्ड हे पॅन कार्ड आणि बॅंक खात्याशीही लिंक करणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच आता आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना ते अद्ययावत (aadhar card update) करून घेण्याबाबत मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये  राज्यात पुणे, (Pune) मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली असून केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.    


तुमच्या आधार कार्डला दहा वर्षे झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्ययावत (aadhar card update) करावे लागणार आहे. पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच, त्यात बदल झाला नसला तरी पडताळणीसाठी सध्याचा पत्ता आधार केंद्रात (Aadhaar Center) द्यावा लागणार आहे. ही बाब ऐच्छिक आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट झाल्यास संबंधित व्यक्ती त्याच पत्त्यावर राहत असल्याचे स्पष्ट होणार आहे. शिवाय, बॅंक खात्यासह आणि सरकारी अनुदान योजनांसाठी ई-केवायसी (E-KYC) करणे सोपे जाणार आहे. (Aadhar Cards Latest News)  


वाचा : सणासुदीच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ की घट?   


नवीन आधार कार्डसाठी कोणती कागदपत्र लागणार?


नवीन आधार कार्ड काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. अर्जदाराचा पासपोर्ट, (passport) पॅन कार्ड, (pancard) रेशन कार्ड, (ration card) मतदार ओळखपत्र, (Voter ID Card) चालक परवाना (Driver's license) यापैकी एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. वयाच्या पाच वर्षांपर्यंत जन्म प्रमाणपत्र. शालेय विद्यार्थ्यांसाठी बोनाफाइड (Bonafide). तसेच, कोणतीही कागदपत्रे नसल्यास ‘ॲनेक्झर ए’ (Annexure A) अर्जाची सुविधा असणे गरजेचे आहे.


आधार कार्डसाठी पोर्टल


https://www.uidai.gov.in/


- पोर्टलवर नजीकच्या स्थायी आधार नोंदणी केंद्र, बॅंक, टपाल कार्यालयाची माहिती


- आधारकार्डमध्ये बदल करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसई) उपलब्ध


- नवीन आधार कार्ड, मोबाईल लिंक, छायाचित्र बदलताना नोंदणी केंद्रावर जाणे आवश्यक


- आधारकार्ड हरविल्यास आधार क्रमांकांवरून ऑनलाइन डाऊनलोड करता येते.


- पीव्हीसी आधार कार्डसाठी 50 रुपये शुल्क


मोबाईल ॲपवरही सुविधा


mAadhaar


तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक


1947