आता आधार कार्ड दाखवल्याशिवाय मिळणार नाही दारू
केंद्र सरकारकडून आधार नंबर बॅंक अकाऊंट, पॅन आणि मोबाईलसोबत लिंक केल्यानंतर आता तेलंगानामध्ये आधारशी संबंधीत एक नवीन नियम करण्यात आलाय.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून आधार नंबर बॅंक अकाऊंट, पॅन आणि मोबाईलसोबत लिंक केल्यानंतर आता तेलंगानामध्ये आधारशी संबंधीत एक नवीन नियम करण्यात आलाय.
हा नियम तेलंगानाच्या एक्साइज डिपार्टमेंटकडून करण्यात आला आहे. या नियमानुसार आता हैदराबादमध्ये दारू विकत द्यायची असेल तर आधी आधार कार्ड दाखवावं लागणार आहे.
राज्यातील वाढती गुन्ह्यांची संख्या पाहता एक्साइज डिपार्टमेंटने हा नियम तयार केला आहे. म्हणजे या राज्यातील लोकांना आता पबमध्ये आधार कार्ड दाखवणे अनिवार्य केले आहे. एका अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्यासोबत शाळेत असलेल्या एका विद्यार्थिनीची हत्या केली होती. त्यानंतर शहरातील सर्वच पबमध्ये २१ वयापेक्षा कमी असलेल्या कुणालाही आत न घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यासोबतच अल्पवयीन वेटरनाही बंदी घालण्यात आली आहे.