Adhar Card बाबत मोठी बातमी! UIDAI ने ट्वीट करून दिली माहिती
आधार कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UIDAIने आधारकार्ड बाबत अपडेट दिली आहे.
नवी दिल्ली : आधार कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UIDAIने आधारकार्ड बाबत अपडेट दिली आहे. UIDAIने आता आधारकार्ड ऑनलाईन डाऊनलोड करणे सोपं केलं आहे. प्राधिकरणाने एक लिंक शेअर केली आहे. त्यावर क्लिक करून आधारकार्ड डाऊनलोड करता येते.
UIDAI ने केले ट्वीट
UIDAI ने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर ट्वीट करून या सुविधेची माहिती दिली आहे. आधारकार्ड सध्या भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचे दस्तऐवज आहे. बँकांचे काम असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड महत्वाचे आहे.
आधारकार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी प्राधिकरणाने एक लिंक ट्वीटद्वारे शेअर केली आहे.
असे करा डाऊनलोड
आधारकार्डला ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी UIDAIने दिलेल्या लिंकवर क्लिक करा (eaadhaar.uidai.gov.in/)त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करा. त्यानंतर काही स्टेप्सची प्रक्रिया करून आधार डाऊनलोड करा.
1 UIDAIच्या eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
2 आपला 12 अंकी आधार नंबर नमूद करा
3 सुरक्षा कोड किंवा कॅप्चा नमूद करा
4 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा
5 ओटीपी आपल्याला आधार-नोंदणीकृत मोबाईल नंबवर पाठवला जाईल.
6 ओटीपी नमूद करा
7 डाऊनलोड पर्यायावर जाऊन आधारकार्ड डाऊनलोड करा