मुंबई : आजच्या घडीला आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वाधिक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक ठरत आहे. प्रत्येकाच्या कागदपत्रांच्या गर्दीत आधार कार्डला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करायची असेल, तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डच मागितलं जातं. (Aadhaar Security Tips UIDAI tips to link and update card)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का, हे इतकंसं दिसणारं आधार कार्ड जपणंही तितकंच महत्त्वाचं. कारण, या कार्डचा चुकीचा वापर होण्याचीही तितकीच शक्यता. 


तुमचं नाव, पत्ता, लिंह, जन्मदिवस, बोटांचे निशाण, डोळ्यांचे स्कॅन, फोटो, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी अशी बरीच माहिती या आधार कार्डशी जोडलेली असते. त्यामुळं तुम्ही या माहितीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. 


यूआईडीएआईच्या म्हणण्यानुसार आधारचा ओटीपी कोणासोबतही शेअर करु नका. अनेकदा आधार डाऊनलोड करण्यासाठी बरेचजण सार्वजनिक संगणकांचा वापर करतात आणि मग ते डिलीट करणं विसरुन जातात. 


अशा परिस्थितीत हा सल्ला दिला जातो की, आधार फक्त यूआईडीएआई संकेतस्थळाच्याच माध्यमातून जनरेट करावं, खासगी संगणक किंवा फोनवरच ते ओपन करावं. 


तुम्ही बायोमॅट्रिक डेटा लपवूही शकता 
असं करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या संकेस्थळाला भेट द्या. इथं my aadhaar हा पर्याय निवडा. आधार सेवांमध्ये लॉक/अनलॉक बायोमेट्रिकवर क्लिक करा. यानंतर एक नवा बॉक्स तुमच्यासमोर येईल. इथं एका बॉक्सवर क्लिक करा. आधार कार्ड क्रमांक आणि केप्चा टाईप करा. 


नोंद असणाऱ्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाईप करुन इनेबल लॉकिंग फीचरवर क्लिक करा. लगेचच तुमचा बायोमॅट्रिक डेटा लॉक होईल. 


मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी वेरिफाय करा 
http://www.uidai.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर माय आधार हा पर्याय निवडा. तिथं ‘वेरिफाय ईमेल/मोबाइल नंबर’ टाईप करा. तुमच्यासमोर एक नवा पर्याय सुरु होईल. इथं तुमचा आधार क्रमांक टाईप करा आणि मोबाईल क्रमांकही टाईप करा. इथं वेरिफिकेशन आणि केप्चा यांसारख्या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.