सुरक्षेच्या दृष्टीने आधार धोकादायक - सुब्रमण्यम स्वामी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही आधार कार्डच्या सुरक्षीततेबाबत शंका उपस्थित केली आहे. आधार कार्ड हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरू शकते, असे सुब्रमण्यम स्वामी यांचे म्हणने आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही आधार कार्डच्या सुरक्षीततेबाबत शंका उपस्थित केली आहे. आधार कार्ड हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरू शकते, असे सुब्रमण्यम स्वामी यांचे म्हणने आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आधार हे देशाच्या सुरक्षिततचेच्या दृष्टीने धोका ठरू शकते. त्यामुळे याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच एक पत्र लिहीणार आहोत. तसेच, मला पूर्ण विश्वास आहे की, सुप्रीम कोर्ट याला (आधार) नक्की मागे घेईन.
आधारच्या बंधनकारीतेबद्धल सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोबाईल फोन आधार कार्डला लिंक करण्याच्या बंधनाबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागीतली आहे. मात्र, कोर्टाने ममता यांना झटका दिला आहे.
ममता बॅनर्जींच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आपण संसदेने केलेल्या कादयद्याविरोधात कसे जाऊ शकता. तसेच, राज्य सरकारही केंद्र सरकारने केलेल्या कायद्याविरोधात कसे काय जाऊ शकते, असा सवालही सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जी यांना केला आहे. तसेच, असेच जर असेल तर, राज्य सरकारने बनवलेल्या कायद्यांविरोधातही केंद्र सरकार न्यायालयात आव्हान देऊ शकते.