Manish Sisodia Resignation: आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन सध्या वेगवेगळ्या आरोपांमध्ये जेलमध्ये आहेत. मनिष सिसोदिया यांना नुकतंच सीबीआयने (CBI) कथित दारु घोटाळा प्रकरणी (Liquor Policy Case)अटक केली आहे. यानंतर दिल्लीत राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनिष सिसोदिया यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हे राजीनामे स्विकारले आहेत. 


२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन सध्या जेलमध्ये असून जर कोर्टाने त्यांना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली तर दोघांनाही आपला मतदारसंघ गमवावा लागणार आहे. शिक्षा झाल्यास दोन्ही नेते पुढील सहा वर्षं निवडणूक लढवू शकणार नाहीत. 


मद्यविक्रीबाबतच्या अबकारी धोरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी (Delhi Excise Policy Case) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सीबीआयने सोमवारी बेड्या ठोकल्या. अटकेनंतर कोर्टात हजर केलं असता त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान सत्येंद्र जैन यांनी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) मे महिन्यात अटक केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. 


मनिष सिसोदिया दिल्लीचे उपुख्यमंत्री होते. तसंच त्यांच्याकडे शिक्षण आणि इतर महत्त्वाची खाती होती. दरम्यान सत्येंद्र जैन हे दिल्लीचे आरोग्य आणि कारगृह मंत्री होते. पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिल्याने आम आदमी पक्षासमोर मोठ्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. आपल्या दोन्ही नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. दोन्ही नेत्यांना कोर्टाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा कारावास सुनावला तर पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होईल.
 


अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांचा राजीनामा केला मंजूर..