नवी दिल्ली : दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाची (AAP) नजर आता राजस्थानवर असणार आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ऐतिहासिक विजयानंतर आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता राजस्थानमध्ये 'आप'ने संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. 'आप'ने रविवारी राजस्थानमध्ये पहिली मोठी कार्यकर्ता परिषद घेतली. (AAP Next mission is Rajasthan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये आपला संधी दिसत आहे. राजधानी जयपूरमध्ये झालेल्या या आपच्या परिषदेत राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी 2023 मध्ये राजस्थानमध्ये आप सरकार स्थापन करण्याचा दावा केला.


राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, येथे सर्व चांगल्या लोकांचे स्वागत आहे. आम्हाला आता थांबण्याची किंवा खचून जाण्याची गरज नाही. 2023 मध्ये राजस्थान जिंकूनच मरायचे आहे. भाजप, काँग्रेस आणि बसपामध्येही चांगल्या लोकांची कमतरता नाही. तेथे अनेक नेते नाराज आहेत. चांगल्या नेत्यांसाठी आम आदमी पार्टीचे दरवाजे नेहमीच खुले असतात. पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीचा पुढचा मुक्काम राजस्थान आहे.'


आम आदमी पक्षाने दिल्लीला लागून असलेल्या राज्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलमध्ये पक्षाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा आप नेत्यांनी केला.


राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाला शून्यातून प्रवास सुरू करायचा असून त्यासाठी वेळ कमी आहे. राज्यात 18 महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत.