मुंबई : आनंद  महेंद्र यांनी रिट्विट केलेला हा व्हिडिओ पाहून आपण किती लहान लहान गोष्टींसाठी रडत असतो, सारं संपलं असं मत किती सहज बनवतो याचा विचार नक्की कराल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 परदेशातील एका कुटुंबात हात- पाय नसलेला, अवघ्या काही वर्षांचा मुलगा कोणाचाही आधार न घेता  घसरगुंडीवर कसा चढतो आणि या खेळाचा आनंद घेतो याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अपंग मुलाची आई त्याच्या प्रयत्नांना बळ देते पण थेट मदत करत नाही. हात -पाय नसूनही खेळाचा आनंद घेण्याचे या मुलाचे प्रयत्न वाखाण्याजोगे आहेत. 



 


  महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना एक खास संदेश लिहला आहे. ”सुरुवातीला मी हे दृश्य पाहू शकलो नाही. पण नंतर स्वतःला सावरले. कोणतेही काम कठिण असते अशी तक्रार मी यापुढे कधी करेन असे मला वाटत नाही.”


  महिंद्रांच्या या ट्विटवर बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही रिट्विट केले असून हा व्हिडिओ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्रांचे हे ट्विट एका दिवसात १६ हजार जणांनी रिट्विट केले.  २६ हजार लोकांनी हे ट्विट लाईक केले असून १४०० जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.