महाआघाडीसाठी धोक्याची घंटा, राहुल गांधीवर अविश्वास
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षांतर्गत राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले गेले असले तरी भाजप विरोधी पक्षांनी मात्र राहुल गांधी यांच्यावर अविश्वास दाखवल्याचं पाहायला मिळतंय. महाआघाडीवर आपला विश्वास नसल्याचं सांगून आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला चांगला झटका दिला आहे.
उघडपणे बंड
राज्यसभा उपसभापती निवडणूकीवेळी सुद्धा आम आदमी पक्षाने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील दुरावा स्पष्ट दिसून येत आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली तर पश्चिम बंगालमधीलच काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात उघडपणे बंड केले.
आघाडीत बिघाडी
सोनिया गांधी यांना समजल्यामुळे राफेल विरोधात संसदेत रान पोचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात निदर्शन करावी लागली. राहुल गांधी यांचे नेतृत्व इतर पक्षांनी स्विकारले नसल्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे.