भाजप फुले-आंबेडकरांच्या नावाचा वापर करतंय, कॉंग्रेसची टीका
कॉंग्रेसची भाजपवर टीका
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : केंद्र सरकार आता महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उत्सव साजरा करणार आहे. यावर कांग्रेसने जोरदार टीका केलीय. हेडगेवार आणि गोळवळकर आद्य दैवत असलेले भाजप फुले आंबेडकरांच्या नावाचं वापर करताहेत असा आरोप मंत्री नितीन राऊत यांनी केलाय. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
कोविड उत्सवाला महापुरूषांचे नाव देणं चुकीचे आहे. फुले, आंबेडकरांनी संघ विचारधारा विरोधात होते. गोळवळकर हे भाजपचे आद्य दैवत आहेत. फुले, आंबेडकर नाहीत अशी टीका नितीन राऊत यांनी केली.
कोरोनात भाजप राजकारण करतंय. राज्यात कोविड उत्सव साजरा केला जाणार नाही. मेणबत्ती, टाळी, थाळी नंतर आता उत्सव कसला साजरा करताय? असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केलाय.
कॉंग्रेसची विकेट जाणार नाहीत. आमचे नेते सिक्सर मारणारे आहेत. कोण चांगली बॅटींग ते कळेल. आयपीएल आल्यानं भाजपचा खेळ चाललाय असा टोला राऊत यांनी लगावला.