फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय

Cricket : एकेकाळी भारताचा स्टार क्रिकेटर आणि विस्फोटक फलंदाज राहिलेला विनोद कांबळी सध्या त्याच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्रस्त आहे. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मित्र विनोद कांबळीची झालेली अवस्था पाहून सचिन तेंडुलकर देखील अस्वस्थ झाला होता. एकेकाळी स्टार क्रिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद कांबळीचं करिअर हे व्यसनाधीनतेमुळे धुळीस मिळालं. मात्र जागातिक क्रिकेटमध्ये देखील असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांचं करिअर व्यसनामुळे उध्वस्त झालंय. 

| Dec 04, 2024, 12:52 PM IST

 

 

1/8

विनोद कांबळी :

लहान वयात क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा विनोद कांबळी हा एकेकाळी सचिन तेंडुलकर पेक्षा देखील टॅलेंटेड मानला जायचा. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा फलंदाज म्हणून सुरुवात केलेल्या कांबळीच्या क्रिकेट करिअरचा अंत देखील दुःखदायक होता. 

2/8

विनोद कांबळी याने सचिन तेंडुलकर प्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं. वर्ष 1993 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना कांबळीने टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं तेव्हा तो केवळ 21 वर्षांचा होता. तर पुढील 17 टेस्ट सामन्यात त्याने दोनदा द्विशतक ठोकलं होतं. व्यसन आणि ग्लॅमर इत्यादींमुळे कांबळीच्या करिअरचा अंत झाला असे म्हटलं जातं.   

3/8

एंड्रयू साइमंड्स

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर एंड्रयू साइमंड्स याच करिअर देखील व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त झालं. एंड्रयू साइमंड्स हा एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि लिडिंग विकेट टेकर होता. 

4/8

2009 पर्यंत एंड्रयू साइमंड्सच करिअर रुळावर होतं मात्र त्यानंतर त्याला उतरतीकळा लागली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याला अनुशासनाचं पालन न केल्यामुळे संघातून बाहेर केलं होतं, त्यानंतर तो पुन्हा संघात पुनरागमन करू शकला नाही. 2022 मध्ये त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

5/8

जेसी राइडर

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर जेसी राइडरच्या करिअरची सुरुवात धमाकेदार पद्धतीने झाली होती. टेस्ट आणि वनडे करिअरमध्ये त्याने प्रत्येकी 3 शतक लगावली. टी 20 मध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स चांगला होता मात्र दारूच्या व्यसनामुळे त्याचं करिअर उध्वस्त झालं. 

6/8

मार्च 2013 मध्ये क्राइस्टचर्चमध्ये काही लोकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर जेसी राइडर बरेच दिवस कोमात होता. यानंतर पुन्हा त्याचे पुनरागमन झाले त्यावेळी त्याने एका सामन्यात शतकही ठोकलं. पण पुन्हा दारूच्या व्यसनामुळे त्याच्या करिअरला उतरतीकळा लागली.

7/8

जेम्स फॉकनर :

ऑस्ट्रेलियाचा आणखीन एक ऑल राउंडर जेम्स फॉकनर याला करिअरच्या सुरुवातीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मात्र अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं. जेम्स फॉकनर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा देखील भाग  होता. 

8/8

व्यसनाधीनतेमुळे फॉकनरचं क्रिकेट करिअर उध्वस्त झालं. 2015 मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मँचेस्टरमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.