अलाहबाद :  नोएडाच्या बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहबाद हायकोर्टाने गुरूवारी आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात राजेश आणि नुपूर तलवार यांना हत्याप्रकरणी सुटका करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात न्यायमूर्ती बी. के. नारायण आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्र यांच्या खंडपीठाने दुपारी तीन वाजता आपला निर्णय देतना दोघांना दोषी नाही मानले. सध्या ते डासना जेलमध्ये बंद आहे. त्यांची उद्या सुटका करण्यात येणार आहेत. खंडपीठाने आपला निर्णय सांगता म्हटले की सीबीआयच्या तपासात कमतरता होती. प्रकरणात तलवार दाम्पत्याला संशयाचा लाभ मिळाला. 


या प्रकरणात आरोपी दाम्पत्य डॉ. राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा केली होती. त्या विरोधात अलहाबाद न्यायालयात अपील केली होती.  


विशेष उल्लेखनीय गोष्ट की तलवार यांची मुलगी हिची हत्या १५ आणि १६ मे २००८ च्या दरम्यान रात्री नोएडा सेक्टर २५ च्या घरात हत्या करण्यात आली होती. घराच्या छतावर त्यांचा नोकर हेमराज याचा मृतदेह सापडला. या हत्याकांडात नोएडा पोलिसांनी २३ मे रोजी डॉ. राजेश तलवार यांना मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्या प्रकरणी अटक केली. या प्रकरणाची चौकशी एक जून रोजी सीबीआयला सोपविण्यात आली होती. 


सीबीआयने केलेल्या चौकशीनुसार गाजियाबादच्या सीबीआय कोर्टाने २६ नोव्हेंबर २०१३ रोजी हत्या आणि पुरावे मिटविण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.