नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या सिकंदराबादमध्ये केलंय. एका रॅलीला संबोधित करताना शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहिण - काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ममता बॅनर्जी इथं येऊन कथ्थक नृत्य करू लागल्या आणि कर्नाटकचं मुख्यमंत्री गीत गाऊ लागल्या तर कोण ऐकेल?' असं त्यांनी मंचावर जाहीर वक्तव्य केलं. ते इथवरच थांबले नाहीत तर 'पप्पू म्हणतो की पंतप्रधान बनणार, आता तर पप्पूची पप्पी (प्रियांका गांधी) देखील आलीय. यांच्यापेक्षा अधिक पाहायचं असेल तर आमचा वाघ मोदी आहे' असं त्यांनी म्हटलं. 



याआधीही मोदी सरकारमधील मंत्री डॉ. महेश शर्मा यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी महेश शर्मा यांच्यावर 'देवाला मूर्ख म्हटल्याचा' आरोप केला होता.


 

'सर्वांच्या सर्व इच्छा देव पूर्ण करू शकत नाही मग एक खासदार त्या कशा पूर्ण करू शकेल' असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. भजनलाल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.