मुंबई : राजस्तानच्या अलवर जिल्ह्यातील एका कुटुंबाने त्यांच्या घरातील नवजात बालकाचे नाव अभिनंदन असे ठेवले आहे. १ मार्च रोजी भारतीय वैमानिक अभिनंदन यांची पाकिस्तानच्या जाळण्यातून सुटका झाली. म्हणून या कुटुंबाने बाळाचे नाव अभिनंदन असे ठेवले आहे. बाळाचे आजोबा जनेश भूटानी यांना यासंबंधीत विचारणा केली असता ते म्हणाले, 'माझ्या सूनेने शूक्रवारी संध्याकाळी मुलाला जन्म दिला. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या शौर्याचे आणि कर्तुत्वाचे किस्से संपूर्ण जगात वाऱ्यासारखे पसरत आहेत आणि आमच्या कुटुंबाला त्यांच्यावर गर्व आहे म्हणून आमच्या घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे नाव आम्ही अभिनंदन असे ठेवले आहे.' भूटानी कुटुंब हे अलवर जिल्ह्यातील किशनगड मध्ये राहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. शूक्रवारी रात्री ९ वाजता भारतीय वैमानिक अभिनंदन भारतात दाखल झाले.   


त्याचचप्रमाणे २७ फेब्रुवारी रोजी नागैरच्या एका कुटुंबाने त्यांच्या नवजात बालकाचे नाव मिरज असे ठेवले आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने या दहशवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतीय वायूदलाच्या १२ मिरज २००० विमानांनी पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्धवस्त केले. म्हणून डाबडा गावच्या एका दाम्पत्याने त्यांच्या मुलाचे नाव मिरज असे ठेवले.