नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना आज पाकिस्तानातून भारतात आणले जाणार आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत अभिनंदन हे भारताच्या ताब्यात असतील. अभिनंदन यांचे आई वडीलही रात्री उशीरा दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान अभिनंदन यांच्या घरवापसीती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनंदन यांना विमानाने वाघा बॉर्डरपर्यंत आणण्याची मागणी भारताने केली होती. पण पाकिस्तानने ही मागणी फेटाळली आहे. भारताला सोपावण्यापूर्वी अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. अटारी बॉर्डरवर अभिनंदन यांना पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. आज बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम रद्द केल्याची माहीतीही देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनंदन यांच्या घरवापसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी भारतीय उच्चायुक्त आणि भारतीय वायुसेनेचे अधिकारी अटारी-वाघा बॉर्डरच्या दिशेने रवाना झाले. आता ही कार्यवाही पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय उच्चायुक्ताच्या वतीने गौरव अहलूवालिया यांनी शुक्रावरी भारतीय पायलट अभिनंदन यांना भारतात आणण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचा दौरा केला. तर भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन जेटी क्रेन देखील पायलट संदर्भातील कागदपत्रे घेऊन लाहोर पोहोचले.  ते पायलट अभिनंदन यांना भारतात घेऊन येतील. 


...म्हणून अभिनंदन यांच्या अफाट बुद्धीमत्तेचे होतेय कौतुक



पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करत मिग 21 घेऊन उड्डाण करणारे अभिनंदन पाकच्या हद्दीत पोहोचले. मिग 21 ला अपघात झाल्यानंतर त्यांनी पॅराशूटचा वापर करत उड्डाणाचा प्रयत्न केला. पण ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. तिथल्या स्थानिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना आपल्या ताब्यात घेतले. दुसऱ्या महायुद्धापासून अभिनंदन यांचा परिवार वायु सेनेत सेवा करत आहे. 


अभिनंदन यांचे आई वडील एअरपोर्टवर आल्यावर टाळ्यांचा कडकडाट आणि कडक सॅल्यूट


 



अभिनंदन यांच्या वडिलांना परम विशिष्ट सेवा पदका सहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अभि जिवंत आहे, जखमी नाही आहे. शुद्धीत आहे. त्याच्या बहादुरीच्या बोलण्यावरून हे समजत आहे. तो एक खरा सैनिक आहे. आम्हाला त्याच्यावर खूप गर्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.