श्रीनगर : १३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या बीएसएफचे आयजी राजेश मिश्रा यांनी रविवारी सांगितले की, 'नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात फायरिंग करण्यात आली. पाकिस्तानमधून 250 ते 300 अतिरेकी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पण आमची सेना आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सज्ज आहेत. कोणतंही कारण नसताना पाकिस्तानने गोळीबार केला.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयजी राजेश मिश्रा म्हणाले की, सेना आणि बीएसएफ सैनिकांनी धैर्याने सामना केला. आमचे सैनिक आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. नागरी मालमत्तेचे नुकसान झाले. आम्हीही जोरदार उत्तर दिले. आम्ही त्यांचे अनेक बंकर नष्ट केले. यामध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित झाला पाहिजे. पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे.


आयजी राजेश मिश्रा रविवारी श्रीनगर येथे बीएसएफचे उपनिरीक्षक शहीद राकेश डोभाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील नौगम सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनात उपनिरीक्षक राकेश डोभाल शहीद झाले.


भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 8 सैनिक ठार


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सण-उत्सवाच्या वेळी पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शांतता भंग करण्याचा आणि हिंसाचाराला भडकावण्याचा प्रयत्न केला. ज्याचा निषेध करतो. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताचे 5 जवान शहीद झाले. तर 4 नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. तर 19 लोकं जखमी झाले आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.


पाकिस्तानकडून झालेल्या चिथावणीखोर गोळीबारानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून कडक आक्षेप नोंदवला.


वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. तर भारताच्या या कारवाईने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य मदत करत आहे.