मुंबई : AC Tips and Tricks |  उन्हाळ्यात बहुतांश लोकांच्या घरात एसी बसवलेला असतो. तुम्हीही तुमच्या घरात एसी वापरत असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्याचा अवलंब करून तुम्ही एसीचा थंडावा आणि कार्यक्षमता तर वाढवू शकालच, शिवाय वीज बिलातही बचत करू शकाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  जर तुम्हाला तुमच्या घरातील एसीची कूलिंग सुधारायची असेल तर काही टीप्स लक्षात ठेवा. 
 
 खोलीत एसी चालू करता तेव्हा पंखा देखील चालू करा आणि तो फक्त कमी किंवा मध्यम गतीने चालवा. यामुळे तुमची खोली लवकर थंड होईल.
 
 तुमचा एसी लवकर खराब होऊ नये आणि जास्त काळ टिकावा असे वाटत असेल, तर एसीचा मागील भागात सुर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या.
  
 आपण एसी जास्त वेळ चालू ठेवत नाही कारण त्यामुळे वीज बिल वेगाने वाढते. जर तुम्हाला एसी चालवूनही स्वस्त वीज बिल हवे असेल तर त्यासाठी दर दोन आठवड्यांनी तुमचा एसी फिल्टर साफ केल्यास त्याचा तुमच्या वीज बिलावरही परिणाम होईल.
 
जेव्हा तुम्ही नवीन एसी खरेदी करता तेव्हा अनेक वेळा सांगितले जाते की एसीला वर्षानुवर्षे सर्व्हिसिंगची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की ही एक अफवा आहे आणि तुम्ही तुमचा एसी वेळोवेळी सर्व्हिस करून घ्या. यामुळे, थंडावा टिकून राहतो आणि विजेची बचत देखील करते.


बर्‍याच लोकांना वाटतं की जर त्यांनी एसी कमी तापमानात ठेवला तर त्यांचा जास्त चांगला थंडावा देतो.  परंतू हे बरोबर नाही आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) म्हणते की तुम्ही तुमच्या एसी 24 अंशांवर सेट केल्यावर तुम्हाला उत्तम कूलिंग मिळू शकते.